नाशिककरांना दिलासा 5 हजार बेड रिकामे, ऑक्सिजनची मागणी घटली; ‘या’ कारणामुळं चिंता कायम

नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी असून जिल्ह्यात 5 हजार बेड रिकामे असून ऑक्सिजनची मागणी घटली आहे. (Nashik Corona Update)

नाशिककरांना दिलासा 5 हजार बेड रिकामे, ऑक्सिजनची मागणी घटली; 'या' कारणामुळं चिंता कायम
Corona
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 11:15 AM

नाशिक: महाराष्ट्रातील महानगर कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असल्याचं चित्र समोर येतं आहे. नाशिक (Nashik Corona Update) जिल्ह्यात आठवडा भरात कोरोना रुग्णसंख्या आणखी आटोक्यात आली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 5.74 पर्यंत झाला कमी झाला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे शहरातील रुग्णालयांमध्ये 5 हजार पेक्षा जास्त बेड रिकामे आहेत. जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी देखील घटली आहे. नाशिकमधील ऑक्सिजन ची मागणी देखील 20 टक्क्यांनी घटली आहे. 10 हजार रेमडिसिव्हीर साठा देखील उपलब्ध जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहे. हे दिलासादायक चित्र असलं तरी नाशिककरांसमोर मृत्यूदर कमी करणं हे देखील आव्हान आहे. (Nashik Corona Update five thousand beds are available in Nashik corona positivity rate decreased but death rate is high)

नाशिकमध्ये 5 हजार बेड रिकामे

नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीचा पॉझिटिव्हीटी रेट 5.74 पर्यंत कमी झाला आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये 5 हजार पेक्षा जास्त बेड रिकामे आहेत. तर ऑक्सिजन ची मागणी देखील 20 टक्क्यांनी घटली आहे. नाशिकमध्ये 10 हजार रेमडिसिव्हीर साठा देखील उपलब्ध असल्यानं नाशिककरांची चिंता थोडीशी कमी झाली आहे.

म्युकरमायकोसिस संदर्भात महत्वाची बैठक

नाशिक जिल्ह्यात कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमुळे चिंता वाढली होती. म्युकरमायकोसिस संदर्भात महापौर निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. तज्ञ डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी यांच्यात ही बैठक होाणार आहे. म्युकरमायकोसिस नियोजनाबाबत बैठकीत चर्चा होणार असून शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

नाशिक कोरोना अपडेट 25 मे 2021

  1. पूर्ण बरे झालेले रुग्ण- 1544
  2. पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 765
  3. नाशिक मनपा- 337
  4. नाशिक ग्रामीण- 411
  5. मालेगाव मनपा- 017
  6. जिल्हा बाह्य- 00
  7. नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4479
  8. एकूण मृत्यु -65
  9. नाशिक मनपा- 38
  10. मालेगाव मनपा- 03
  11. नाशिक ग्रामीण- 24
  12. जिल्हा बाह्य- 00

मृत्यूदर वाढत असल्यानं चिता वाढली

नाशिक जिल्ह्यात दिवसागणिक पॉझिटिव्ह रुग्ण संख्या घटत आहे. दुसरीकडे मात्र मृत्यू दर वाढत असल्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झालीय. मंगळवारी दिवसभरात 65 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू दर कमी करणं नाशिककरांसमोर आव्हान बनलं आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: नाशिकच्या खासगी रुग्णालयाकडून आकारलं जातंय अवाजवी बिल, सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप

कोरोना रुग्णांच्या मदतीला जैन समाजबांधव धावले, नाशिकच्या पिंपळगावात महिनाभरापासून अन्नदानाचा उपक्रम

(Nashik Corona Update five thousand beds are available in Nashik corona positivity rate decreased but death rate is high)

Non Stop LIVE Update
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.