AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्युकरमायकोसिस आणि लहान मुलांवरील उपचारांच्या नवीन आव्हानांसाठी प्रशासन सज्ज, भुजबळांचा दावा

म्युकरमायकोसिस आजार, लहान मुलांना असणाऱ्या धोक्याच्या अनुषंगाने नवीन आव्हानांसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा दावाही भुजबळ यांनी केलाय.

म्युकरमायकोसिस आणि लहान मुलांवरील उपचारांच्या नवीन आव्हानांसाठी प्रशासन सज्ज, भुजबळांचा दावा
नाशिक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा छगन भुजबळांकडून आढावा
| Updated on: May 29, 2021 | 5:29 PM
Share

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी नाशिक जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधितांची कमी होणारी रुग्णसंख्या दिलासादायक बाब असल्याचं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. तरीही तिसऱ्या लाटेची तयारी आणि कोरोनानंतर होणारा म्युकरमायकोसिस आजार, लहान मुलांना असणाऱ्या धोक्याच्या अनुषंगाने नवीन आव्हानांसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा दावाही भुजबळ यांनी केलाय. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना आणि कोरोनानंतरच्या आजारांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. (Review meeting in the presence of Chhagan Bhujbal in Nashik)

कोरोनानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजाराच्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्यक डॉक्टर्स, बेडस् आणि औषधे उपलब्ध करून घेण्यात येत आहेत. तसंच या आजारासाठी लवकरात लवकर शस्त्रक्रीया विभाग कार्यान्वित करण्यात येत आहे. त्याचबरोबर म्युकरमायकोसिसचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला असल्याने या बाधित रुग्णांना याचा लाभ होणार आहे. याचप्रमाणे लहान मुलांना असणारा संभाव्य धोका लक्षात घेता त्यांच्यासाठी आवश्यक असणारा औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून घेण्यात येत आहे. सध्याच्या काळात सुरू असलेली कोविड केअर सेंटर्स बंद न करता त्यांची योग्य निगा राखून, त्यांना नियमित सॅनिटाईज करण्यात यावं, अशा सूचना भुजबळ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

‘आदिवासी भागात लसीकरणासाठी जनजागृती गरजेची’

आदिवासी भागातील नागरिकांमध्ये कोरोना उपचार व लसीकरणाच्या अनुषंगाने स्थानिक नागरिक, लोक कलावंत, शिक्षक अशा व्यक्तिंच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी. त्याचप्रमाणे यासाठी आयुर्वेदीक डॉक्टरांचंही सहकार्य घेण्यात यावं. जेणेकरून आदिवासी भागातील नागरिकांच्या मनातील लसीकरणा विषयीचे गैरसमज दूर होण्यासाठी मदत होईल, असंही भुजबळ यांनी संबंधितांना सांगितलं.

शिथिलतेनंतरही नियम पाळा, भुजबळाचं आवाहन

कडक निर्बंध काही प्रमाणात शिथिल करतांना जीवनावश्यक वस्तुंच्या व्यतिरिक्त इतर व्यावसायिकांना देखील वेळेचं आणि कोरोना विषयक नियमांचं कोटेकोरपणे पालन करावं लागेल. ठराविक वेळेसाठी दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना आल्यानंतर त्याप्रमाणे जिल्हास्तरावर योग्य ते निर्णय घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. तसंच बाजार समित्यांमध्ये सध्या कार्यरत असलेली कोरोना विषय नियमावली आणि चाचण्या करणं सुरूच ठेवावं, याबाबत पोलिस यंत्रणेनंही लक्ष घालण्याची सूचना भुजबळांनी केलीय.

Chhagan Bhujbal Review Meeting

नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा छगन भुजबळांकडून आढावा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील लहान मुलांना असणारा संभाव्य धोका लक्षात घेवून त्यांच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयांना नाशिक व मालेगाव महानगरपालिकेने परवानगी द्यावी. तसेच म्युकरमाकोसिसच्या उपचार व शस्त्रक्रीयेसाठी 6 खाजगी नाक, कान व घसा तज्ज्ञ अशा डॉक्टरांनी आपली सेवा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री यांनी त्यांचे आभार मानले.

म्युकरमायकोसिसच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कृती दल

या बैठकीत म्युकरमायकोसिसबाबत नियोजनाची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. म्युकरमायकोसिस आजारावर नियंत्रण आणण्यासाठी आणि औषोधोपचार वेळेत उपलब्ध होण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत जिल्‍ह्यातील 6 रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून ऑक्सिजनच्या कायमस्वरूपी सुविधेसाठी जिल्ह्यात 55 नवीन ऑक्सिजन प्रकल्प तयार करण्यात येत आहेत. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हापातळीवर सर्व यंत्रणांच्या समन्वयाने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित बातम्या :

नाशिक जिल्ह्याचे ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे पाऊल, 40 ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालरोग तज्ज्ञांची भूमिका अत्यंत महत्वाची: छगन भुजबळ

Review meeting in the presence of Chhagan Bhujbal in Nashik

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.