कामावर जीन्स, टी-शर्टसह रंगीबेरंगी कपडे घालून येण्यास बंदी; नाशिक महापालिकेचा धक्कादायक निर्णय

राज्य सरकारने राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरलेली असतानाच नाशिक महापालिकेनेही आश्चर्यकारक निर्णय जाहीर केला आहे. (nashik corporation bans T-shirts, jeans for employees)

कामावर जीन्स, टी-शर्टसह रंगीबेरंगी कपडे घालून येण्यास बंदी; नाशिक महापालिकेचा धक्कादायक निर्णय

नाशिक: राज्य सरकारने राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरलेली असतानाच नाशिक महापालिकेनेही आश्चर्यकारक निर्णय जाहीर केला आहे. नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांना जीन्स, टी-शर्ट आणि स्लीपर घालून कामावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. तर, महिलांना साडी, सलवार-कुर्ता, ट्राऊझर पॅन्ट-कुर्ता परिधान करून येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी हे आदेश जारी केले आहेत. (nashik corporation bans T-shirts, jeans for employees)

नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी आदेश जारी केला असून त्यानुसार पालिकेतील कर्मचाऱ्यांना कामावर जीन्स, टी-शर्ट आणि स्लीपर घालून येण्यास मनाई करण्यात आली आहे. महापालिकेतील 5 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा ड्रेसकोड लागू होणार आहे.

महिलांसाठीही ड्रेस कोड

महिलांसाठीही पालिका आयुक्तांनी ड्रेसकोड लागू केला आहे. जाधव यांनी जारी केलेल्या आदेशानुसार आता महिलांना साडी, सलवार-कुर्ता, ट्राऊझर पॅन्ट-कुर्ता परिधान करूनच कामावर यावे लागणार आहे.

खादी सक्तीची

महापालिका आयुक्त केवळ ड्रेसकोड लागू करूनच थांबलेले नाहीत. तर त्यांनी कर्मचारी-अधिकाऱ्यांना आठवड्यातून एकदा खादीचे कपडे घालून येण्याची सक्तीही केली आहे. त्यामुळे सरकारी आदेश म्हणून या कर्मचाऱ्यांना खादीचे कपडे घ्यावे लागणार आहेत. (nashik corporation bans T-shirts, jeans for employees)

चित्रविचित्र कपडे नकोच

आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार पालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांना यापुढे रंगबेरंगी कपडे, गडद रंगाचे कपडे, चित्रविचित्र नक्षीकाम असलेले कपडे परिधान करता येणार नाही. आयुक्तांच्या या आदेशामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच ड्रेसकोड बदलला म्हणजे कामाचा दर्जा सुधारणार आहे का? असा सवालही केला जात आहे. (nashik corporation bans T-shirts, jeans for employees)

 

संबंधित बातम्या:

Live : नाशिक महापालिकेत जीन्स, टी शर्ट आणि स्लीपरला बंदी, महापालिका आयुक्तांचे आदेश

सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द; ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?

सलग तीन दिवस आजपासून बँका बंद; लवकरात लवकर काढा ATM मधून पैसे

(nashik corporation bans T-shirts, jeans for employees)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI