सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द; ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?

भारतीय रिझर्व्ह बँकेने कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द केल्याने ठेवीदार टेन्शनमध्ये आले आहेत. (RBI cancels Subhadra Local Area Bank's license; know what will happen to depositors' money)

सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द; ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 3:57 PM

कोल्हापूर: भारतीय रिझर्व्ह बँकेने कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द केल्याने ठेवीदार टेन्शनमध्ये आले आहेत. आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या ठेवीदारांची आयुष्याची जमा पुंजी बँकेत अडकल्याने हे ठेवीदार हवालदिल झाले आहेत. बँकेचा परवाना रद्द झाल्याने ठेवीदारांना त्यांची जमा रक्कम काढता येणार नसली तरी रिझर्व्ह बँकेने निर्णय घेतल्यास सीकेपी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या धर्तीवर या ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळू शकते, असं या क्षेत्रातील राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. (RBI cancels Subhadra Local Area Bank’s license; know what will happen to depositors’ money)

सुभद्रा लोकल एरिया बँकेने 2019-2020 या आर्थिक वर्षातील दोन तिमाहीममध्ये किमान नेटवर्थच्या मर्यादेचं उल्लंघन केल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने या बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे या बँकेतील ठेवीदार टेन्शनमध्ये आले आहेत. तसेच बँकेकडे ठेवीदारांचे पैसे परत करण्याएवढीही रक्कम शिल्लक नसल्याने या बँकेचं लायसन्स रद्द करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. ज्या पद्धतीने बँकेचं काम सुरू होतं, त्यानुसार सध्याच्या घडीला आणि भविष्यात ग्राहकांचं मोठं नुकसान झालं असतं, असा ठपकाही बँकेने ठेवला आहे. रिझर्व्ह बँकेने केलेल्या कारवाईमुळे बँकेत ठेवी असणाऱ्या ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या त्या उल्लेखाने आशा पल्लवीत

रिझर्व्ह बँकेने सुभद्रा बँकेचा परवाना रद्द करताना त्यांच्या निर्बंध पत्रात अत्यंत महत्त्वाचा उल्लेख केला आहे. ठेवीदारांचे पैसे परत देता येईल इतकी मालमत्ता सुभद्रा बँकेची असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे. त्यामुळे ही मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया लांबलचक असली तरी ग्राहकांना त्यांचे पैसे मिळण्याची शक्यता तरी त्यातून वाढल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

एकूण 13 ठिकाणी शाखा

या बँकेच्या कोल्हापूर, सांगलीत एकूण 13 शाखा आहेत. शिवाय सातारा आणि बेळगावमध्येही बँकेच्या शाखा असल्याने या मालमत्ता विकून ठेवीदारांना त्यांची जमा पुंजी दिली जाऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं.

सीकेपी बँकेचा नियम लागू झाल्यास

आरबीआयने मुंबईतील सीकेपी को-ऑपरेटिव्ह बंकेचा परवानाही रद्द केला होता. मात्र, आरबीआयने 1,32,170 ठेवीदारांना 99.2 टक्के रक्कम डीआयसीजीसीद्वारे देण्याचा निर्णय घेतला होता. तोच निर्णय सुभद्रा बँकेच्या ठेवीदारांसाठी घेतल्यास या ग्राहकांनाही त्यांची जमा पुंजी मिळेल. अथवा रिझर्व्ह बँकेचे पुढील आदेश येईपर्यंत ही रक्कम गोठवली जाऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं.

बँकेचं विलनिकरण केल्यास रक्कम मिळणार?

या ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळण्यासाठी आणखी एक पर्याय सांगितला जातो, तो म्हणजे या बँकेचे दुसऱ्या एखाद्या बँकेत विलिनिकरण केल्यास ग्राहकांना त्यांची जमा रक्कम मिळू शकते. अर्थात आरबीआयच्या पुढील निर्णयावरच या गोष्टी अवलंबून असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर ठेवी काढल्या

या बँकेची वाटचाल चांगली चालू होती. बँकेच्या ठेवी 100 कोटी पर्यंत पोहोचल्या होत्या. मात्र, गेल्या दोन वर्षात ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणावर त्यांची रक्कम बँकेतून काढून घेतली. त्यामुळे या बँकेची आर्थिक ओढताण सुरू झाल्याचं सांगण्यात येतं.

50 कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

सध्या या बँकेत एकूण 40 ते 50 कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, आता बँकेचाच परवाना रद्द झाल्याने या बँकेतील कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

अण्णासाहेब मोहितेंनी स्थापन केली बँक

उद्योगपती अण्णासाहेब मोहिते यांनी या बँकेची स्थापना 2003 साली केली होती. या बँकेच्या निर्मितीसाठी आधीच प्रयत्न करण्यात आले होते. 1996 साली मोहिते यांना बँकेची निर्मिती करण्याची परवानगीही मिळाली होती. उद्योजक, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसह नागरिकांच्या विकासाच्या हेतूने स्थापन झालेली ही बँक लवकरच लोकप्रियही झाली होती. स्थानिक लोकांना बँकिंगची, बचतीची सवय लागावी, त्यांच्या कर्जाच्या छोट्या छोट्या गरज लगोलग भागाव्यात अशा हेतूने लोकल एरिया बँकांचा जन्म झाला. थेट रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली कारभार चाणारी ही राज्यातील पहिलीच स्थानिक बँक होती. तर देशातील ही चौथी बँक होती.

मंठा, कराड जनता बँकेचाही परवाना रद्द झाला होता

जालन्यातील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातल्यानंतर सातारा जिल्ह्यातील नावाजलेली ‘कराड जनता बँक’ दिवाळखोरीत गेल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेचा परवाना रद्द केला होता. कराड जनता बँक ही सातारा जिल्ह्यात एक नावाजलेली बँक आहे. सहकाराच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या या बँकेचे हजारो ठेवीदार आहेत. या बँकेवर 2017 साली रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते. त्यानंतर आता ही बँक दिवाळखोरित गेल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. ही अधिकृत घोषणा सहकार आयुक्तांनी केली होती. त्याआधी सीकेपी बँकेचाही परवाना रद्द करण्यात आला होता. (RBI cancels Subhadra Local Area Bank’s license; know what will happen to depositors’ money)

या बँकांचे परवाने रद्द

>> सीकेपी को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई)

>> मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (जालना)

>> कराड जनता बँक (सातारा)

>> जयभारत क्रेडिट लिमिटेड (मुंबई)

या बँकेने सरेंडर केलं

>> डिस्ट्रीब्यूटर्स (बॉम्बे) प्राइवेट लिमिटेड (मुंबई) (RBI cancels Subhadra Local Area Bank’s license; know what will happen to depositors’ money)

संबंधित बातम्या:

मिनिटांत कर्ज देणाऱ्या अ‍ॅपमुळे अनेकांनी केली आत्महत्या, RBI ने केलं अलर्ट

आता पण चालू शकते 1, 2 आणि 5 रूपयांची नोट? जर तुमच्या जवळ या नोटा असतील तर पाहा नियम

कोल्हापूरच्या सुभद्रा एरिया लोकल बँकेचा परवाना रद्द; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

(RBI cancels Subhadra Local Area Bank’s license; know what will happen to depositors’ money)

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.