AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat Scandal : सर्वात भयंकर… भोंदूबाबाकडून 500 महिलांचं लैंगिक शोषण? गुलाबी गँगच्या अध्यक्षांचा दावा; महाराष्ट्र हादरला

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर गुलाबी गँगच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांनी 500 महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या दाव्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, उच्चभ्रू महिलाही यात बळी पडल्याचे म्हटले जात आहे. प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू असून, जप्त केलेल्या पेनड्राइव्ह आणि लॅपटॉपमुळे आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat Scandal  : सर्वात भयंकर... भोंदूबाबाकडून 500 महिलांचं लैंगिक शोषण? गुलाबी गँगच्या अध्यक्षांचा दावा; महाराष्ट्र हादरला
भोंदूबाबा अशोक खरात
| Updated on: Mar 20, 2026 | 1:56 PM
Share

नाशिकचा भोंदूबाबा, ज्योतिषी आणि कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याच्या सेक्स स्कँडलने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरून गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या दरबारात बडे राजकारणी, सेलिब्रिटी आणि इतर मोठी माणसंही येऊन गेल्याचं सांगितलं जातं. हे नेते आणि अभिनेते या बाबाचे भक्त होते, त्याच्याकडून पूजाअर्चा करून घ्यायचे अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या बाबाकडे एक पेनड्राईव्ह सापडला असून त्यात 100 व्हिडिओ अश्लील व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे त्याने चार पाच नव्हे तर तब्बल 500 महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा दावाही केला जात आहे. एका महिला नेत्याने हा दावा केला असून उच्चभ्रू महिलाही त्याच्या लैंगिक शोषणाला बळी पडल्याचा दावा या महिला नेत्याने केला आहे.

संगिता तिवारी या गुलाबी गँगच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. कॅप्टन खरात याने भविष्य सांगण्याच्या नादाने सुमारे 500 महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे, असा दावा करून संगिता तिवारी यांनी खळबळ उडवून दिली आहे. यात उच्चभ्रू महिलाही असल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, या बळी पडलेल्या महिला कोण आहेत? याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही. मात्र, या नव्या दाव्याने अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे.

चाकणकरांना जोडे मारू

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या. तसेच त्यांना या प्रकरणात सहआरोपी करा. त्यांना हे प्रकरण माहित होते. तशी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे या प्रकरणात सखोल चौकशी झाली पाहिजे, असं सांगतानाच जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही त्यांना जोडे मारू, असा इशारा संगिता तिवारी यांनी दिला आहे.

अलका टॉकीज परिसरात जोरदार आंदोलन

दरम्यान, तिवारी यांच्या नेतृत्वात चाकणकर यांच्या विरोधात आज पुण्यात अलका टॉकीज परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले. रुपाली चाकणकर यांचा तात्काळ राजीनामा घ्या किंवा त्यांची पदावरून हकालपट्टी करा. ज्या व्यक्तीच्या संस्थेत रुपाली चाकणकर आहेत. त्याचे कारनामे त्यांना माहीत नाही असे कसे होऊ शकते? असा सवाल या आंदोलकांनी केला आहे. तसेच रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करणारे वेगवेगळे व्यंगात्मक पोस्टर हातात घेऊन आंदोलकांनी जोरदार आंदोलन केले.

एसआयटीचा तपास

दरम्यान, या प्रकरणाचा एसआयटी तपास करत आहेत. एसआयटीने भोंदूबाबाच्या घरातून लॅपटॉप आणि पेन ड्राइव्ह जप्त केले आहेत. हे साहित्य फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. त्यात आणखी काय काय निघतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या प्रकरणाने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून भोंदूबाबांच्या भक्तांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!