Sanjay Raut : सरकार उलथवण्यासाठी तंत्रमंत्र, त्या बड्या मंत्र्याचा राजीनामा घ्या; मोठ्या मागणीने खळबळ; भोंदूबाबा प्रकरणात संजय राऊत यांचा थेट शिंदे गटावरच प्रहार
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याला महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्याच्या राजकीय संबंधांमुळे खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणावरून शिंदेवर निशाणा साधत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भोंदू बाबांच्या सल्ल्यानुसार मंत्रीमंडळ काम करत असल्याचा राऊतांचा गंभीर आरोप आहे.

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याला अटक करण्यात आली आहे. स्वयंघोषित ज्योतिषी खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून त्याच्याकडूनल पेनड्राईव्हमध्ये अत्याचाराचे काही व्हिडीओही सापडले आहेत. विशेष म्हणजे या कथिचत बाबाचे जे भक्त आहेत किंवा जे त्याच्या संपर्कात होते, त्यामध्ये अनेक नेते, राजकारणी, सेलिब्रिटी यांचाही समावेश होता अशी माहिती उघड झाली. राष्ट्रवादीचे अनेक नेते, तसेच एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, याच्यासोबत खरातच फोटो समोर आल्याने खळबळ माजली आहे.
याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. भोंदूबाबांच्या मंत्र्यांना फडणवीसांनी बाहेरचा रस्ता दाखवावा, सरकार उलथवण्यासाठी विधी चालल्या होत्या म्हणून धाडी पडल्या. याप्रकरणात बड्या मंत्र्याचा राजीनामा घ्या, अशी मागणी करत राऊतांनी शिंदे गटावरच प्रहार केला आहे.
काय म्हणाले राऊत ?
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री भोंदू बाबाच्या सल्ल्याने काम करतात, कारभार करतात. भोंदू बाबांचा वापर करून, अंधश्रद्धा वापरून हे लोक आपला विभाग चालवतात. नासितच्या त्या बाबाला अटक झाली, ते महाशय अनेक काळ मंत्र्यांना सल्ले देत होते. मंत्रालयातील बढत्या, बदल्या, यात त्या बाबाचा त्या मंत्र्यांच्या माध्यमातून हस्तक्षेप होता. दीपक केसरकर हे शिक्षणमंत्री असताना शिक्षण खात्याच्या अनेक बदल्या, बढत्या करण्यास हे बाबा करायला लावत होते, भाग पाडत असं राऊत म्हणाले. ट्रायडंट हॉटेल मध्ये बसून हे सगळ करायचे. शिक्षण खातं, हे खरात बाबा चालवायचा असा आरोप राऊत यांनी केला.
अशा पद्धतीने राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री काम करत असतील, त्याला कोणी हिंदुत्व मानत असतील तर त्यांना आमचा साष्टांग नमस्कार आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली. हिंदुत्वाच्या नावाने काल आलेले सगळे बडगे आहेत. आम्ही शिवसेनेने अशा ढोंगी गोष्टीचा पुरस्कार केला नाही. त्याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही सरकार सोडलं. रुपाली चाकणकर म्हणजे, हिमनगाचं टोक आहे, इतर 9 मंत्री आहेत. खरात सारखा, एक बाबा गेला पण अनेक इतर बाबा हे बाकी आहेत, असं राऊत म्हणाले.
फडणवीस यांचं सरकार उठवण्यासाठी विधी करण्यात आले म्हणून..
देवेंद्र फडणवीस हे आधुनिकवादी विचार सरणीचे भक्त आहेत. ते सावरकर यांचे भक्त आहेत, ते विज्ञानवादी होते. भोंदू बाबाच्या ठिकाणी फडणवीस यांचं सरकार उठवण्यासाठी विधी करण्यात आले आणि मग या धाडी पडल्या. अंधश्रद्धेच्या माध्यमातून हे विधी केले जात होते, असा आरोप राऊत यांनी केला. या भोंदूबाबांच्या मंत्र्यांना फडणवीस यांनी बाहेरचा रास्ता दाखवला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे
एकनाथ शिंदे यांनी केसरकर यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे जर पक्षाचे नेते असतील, त्यांचा जर अंधश्रद्धेवर विश्वास नसेल तर रुपाली चाकणकरांपाठोपाठी त्यांनी ताबडतोब या मंत्र्यांचा (केसरकर)राजीनामाघेतला पाहिजे. शिंदे गटाचे जे जे मंत्री अशा कृत्यात सहभागी आहेत, त्यांच्यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मोठ्या माशांवर कारवाई कधी होणार हे सांगा, असा सवाल विचारत केसरकर यांचा राजीनामा एकनाथ शिंदे यांच्या गटाने घेतला पाहिजे या मागणीचा राऊतांनी पुनरुच्चार केला.
