AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! माजी सैनिकास मिळाला मानाचा वारकरीचा मान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा

Ashadhi Ekadashi : मानाचा वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले व कल्पना कैलास उगले या दांपत्याला मान मिळाला. गेल्या पंधरा वर्षांपासून ते वारीला येत आहे.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! माजी सैनिकास मिळाला मानाचा वारकरीचा मान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा
मानाचे वारकरी कैलास दामू उगले व कल्पना उगले सोबत मुख्यमंत्री.
Updated on: Jul 06, 2025 | 7:49 AM
Share

आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांच्या मेळ्याने पंढरपूर सजले. वारकऱ्यांच्या भक्तीला उधाण आले. आषाढ धारा कोसळत असताना भक्तीरसात वारकरी चिंब झाले. विठ्ठल दर्शनासाठी संपूर्ण राज्यातून वारकऱ्यांची पावले पंढरपूरकडे वळली होती. सुमारे २० लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले. विठू नामाच्या जयघोषात पंढरपूर नगरी दुमदुमली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. मानाचा वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले व कल्पना कैलास उगले या दांपत्याला मान मिळाला. गेल्या पंधरा वर्षांपासून ते वारीला येत आहे. मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना

आषाढी एकादशीनिमित्त मुख्य मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली. शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारीच पंढरपुरात दाखल झाले होते. पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता आणि कन्या दिविजा यांच्यासह केली. राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पंढरपूर कॉरिडोरसाठी सर्वांना विश्वासात घेणार

शनिवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाची आस लावून पंढरपूर येथे पोहोचतात. वारी दरम्यान वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणीचा विचार करुन २०१८ वर्षीपासून निर्मलवारी सुरुवात केली. याअंतर्गत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली. जी पावले विठुरायाच्या दर्शनाच्या आशेने चालतात, त्या पावलांची सेवा करून विठुरायांच्या चरणाची सेवा केल्याचा प्रत्यंतर यावा, या सेवाभावाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्यावतीने चरणसेवा उपक्रम राबवून वारकऱ्यांचे सेवा केली. त्यांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचे काम केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंढरपूर कॉरिडोरसाठी सर्वांना विश्वासात घेणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

षाढी एकादशी निमित्त विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिरात लाखो भाविकांनी गर्दी केलेली आहे.आज सकाळपासूनच आषाढी एकादशीनिमित्त शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत.

मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO
मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO.
ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल
ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा.
जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान
जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान.
एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?
एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?.
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर.
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा.
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले...
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा.