प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम दिवाळीनंतर होणार जाहीर; नाशिकमध्ये इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

नाशिक महापालिका निवडणुकीसाठीचा प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम दिवाळीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे तिकीट मिळण्याआधीच इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून प्रचार सुरू केला आहे.

प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम दिवाळीनंतर होणार जाहीर; नाशिकमध्ये इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग
नाशिक महापालिका.


नाशिकः नाशिक महापालिका निवडणुकीसाठीचा प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम दिवाळीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे तिकीट मिळण्याआधीच इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून प्रचार सुरू केला आहे.

येत्या फेब्रुवारी महिन्यात होणारी नाशिक महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याच्या निर्णयावर 22 सप्टेंबर रोजी शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार नाशिकमधील प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम 6 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. आयोगाने राज्यातील एकूण 21 महापालिकांना प्रभाग रचना तयार करायला सांगितली आहे. त्यासाठी कुणाच्याही राजकीय दबावाखाली येऊ नका. नाशिकची 2011 मधील लोकसंख्या डोळ्यांसमोर ठेवून नवीन प्रभाग रचना करावी. त्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची समिती नेमावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ही रचना करताना प्रभागाची लोकसंख्या दहा टक्के कमी किंवा जास्त केली तरी चालेल. प्रभागातील वस्त्यांचे विभाजन होणार नाही, प्रगणक गट फुटणार नाहीत, याची काळजी मात्र घ्यावी लागेल. हे सारे नियम धान्यात घेत हे काम सुरू आहे. मात्र, प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम दिवाळीनंतरच जाहीर होणार आहे. कारण सध्या कच्च्या प्रभागरचेने काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम झाल्यानंतर प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याबाबत राज्य निवडणूक आयोग आदेश काढण्याची शक्यता आहे.

आयुक्तांची करडी नजर

प्रारूप प्रभाग रचनेच्या सध्या सुरू असलेल्या कामावर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी करडी नजर ठेवली आहे. प्रभाग रचना करताना कोणाला झुकते माप दिल्याचे आढळल्यास संबंधित निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. शिवाय कच्ची प्रभारचना ज्या रूममध्ये सुरू आहे, तिथे सुरक्षा वाढवली गेली आहे. या रूममध्ये मोबाईल, पेन, पेन्सील, कागद आत नेण्यास आणि बाहेर आणण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

तिकीट मिळण्याआधीच प्रचार

नाशिक महापालिका निवडणुकीची अजून प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करणे सुरू आहे. त्यात नगरसेवकांचे तिकीट कुणाला मिळणार, हे ही संबंधित पक्षांनी जाहीर केलेल नाही. मात्र, त्यापूर्वीच अनेकांनी आपापल्या वॉर्डात आपल्याच तिकीट मिळेल अस गृहीत धरून प्रचार सुरू केला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. आतापासूनच मतांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळे दिवाळीनंतर होणारी महापालिकेची निवडणूक रंगतदार होणार, याच शंकाच नाही.

महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल

भाजप 67
शिवसेना 34
काँग्रेस 6
राष्ट्रवादी 6
मनसे 5
इतर 3

सध्याचे प्रभाग

29 प्रभाग 4 सदस्यीय
2 प्रभाग 3 सदस्यीय

अशी राहील नवी प्रभाग रचना?

40 प्रभाग 3 सदस्यीय
1 प्रभाग 2 सदस्यीय

इतर बातम्याः

पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले 100 कोटींचे घबाड; नोटा मोजायला 80 अधिकाऱ्यांना लागले तब्बल 18 तास

असेल हिम्मत लढणाऱ्यांची, पाच वर्षांच्या अरणाचे धाडस, मलंगगड केला सर!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI