आज संपूर्ण नशिकमध्ये बत्तीगुल, महावितरणकडून वीजपुरवठा दिवसभर बंद; पाणी पुरवठा बंद राहणार, काय आहे कारण?

वर्षातून एक किंवा दोन वेळेला महावितरण कडून शटडाउन केले जाते. पावसाळापूर्व काम आणि इतर मेंटेनन्ससाठी एक दिवस वीज पुरवठा बंद होतो. त्यापार्श्वभूमीवर वीज पुरवठा बंद राहणार आहे.

आज संपूर्ण नशिकमध्ये बत्तीगुल, महावितरणकडून वीजपुरवठा दिवसभर बंद; पाणी पुरवठा बंद राहणार, काय आहे कारण?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 10:01 AM

नाशिक : संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा शनिवारी बंद राहील अशी माहिती नाशिक महानगर पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण धरणावरील वीज पुरवठा खंडित केला जाणार असल्याने पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर महावितरण कंपनीकडून सहा महीने किंवा वर्षभराने एक दिवस पावसाळापूर्वीची कामे किंवा काही अंतर्गत दुरुस्तीच्या कामासाठी एक दिवस शटडाउन केला जातो. नाशिकच्या एकलहरे येथूनच वीज पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे आज संपूर्ण दिवस वीज शहरासह ग्रामीण भागात नसणार आहे. त्यामुळे महावितरणच्या वीज पुरवठा खंडित करण्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

नाशिकच्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापुर धरणासह दारणा आणि मुकणे या तीनही धरणांच्या पंपिंग स्टेशन वर वीज पुरवठा उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे तिथेही काही कामे केली जाण्याची शक्यता असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पावसाळापूर्व कामे केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

खरंतर महावितरणच्या माध्यमातून गंगापूर धरण समूहात सातपुर आणि महिंद्रा फिडरकडून वीज घेण्यात आली आहे. साधारणपणे 33 केवही एचटी ची वीज घेण्यात आली आहे. महापालिकेच्या बारा बंगला शिवार ते शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरी बाग आणि नाशिकरोड विभागाला पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

महावितरणच्या माध्यमातून रेमण्ड सब स्टेशनच्या ठिकाणी कामे मेंटेनन्सची कामे केली जाणार आहे. त्यामुळे शनिवारी संपूर्ण दिवस शहरात वीज पुरवठा नसणार आणि त्यामुळे पाणी पुरवठा देखील बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांना महत्वाच्या असलेल्या वीज आणि पाणी या दोन सुविधा आज पूर्णपणे बंद राहणार आहे.

यापूर्वी असे अनेकदा एकलहरे येथून वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामध्ये बहुतांश ठिकाणी नागरिकांचे हाल होणार आहे. आपत्कालीन ठिकाणी जनरेटरच्या माध्यमातून वीज पुरवठा केला जाणार आहे. त्यामध्ये रुग्णालये आणि काही महत्वाची कार्यालये सुरू ठेवण्यासाठी जनरेटरचा वापर केला जाणार आहे.

शहरातील बहुतांश कार्यालये ही बंद ठेवणं अशक्य आहे. त्यामुळे त्यांची आज संपूर्ण मदार ही इतर वीज पुरवठा करू शकतील अशा उपकरणांवर आहे. त्यामुळे नागरिक वीज पुरवठा खंडित होण्यापूर्वीच सर्व बाजूने दिवसभराचा विचार करीत आहे. बँकेत वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी बँकेच्या वरिष्ठांनी खबरदरी बाळगली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.