बारसूनंतर इगतपुरीतील शेतकरीही आक्रमक, प्रशासन दडपशाही करत असल्याचा आरोप करत दिला गंभीर इशारा, प्रकरण काय?

2004 पासून अप्पर कडवा धरणाला विरोध होत असताना इतका अट्टहास का केला जातो असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. बळजबरीने जमीन घेतल्यास आम्ही सर्व बाधित शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशी खंत येथील शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

बारसूनंतर इगतपुरीतील शेतकरीही आक्रमक, प्रशासन दडपशाही करत असल्याचा आरोप करत दिला गंभीर इशारा, प्रकरण काय?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 12:37 PM

नाशिक : खरंतर राज्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आक्रमक झाल्यानंतर राजकीय पडसाद उमटू लागले आहे. अगदी तशीच परिस्थिती नाशिकच्या इगतपुरीमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील प्रस्तावित अप्पर कडवा धरणाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. दरम्यान शासनाकडून दडपशाहीने जमिनीची मोजणी केली जात आहे. शेत जमीनीच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध असुन आक्रमक भूमिका अन पवित्रा पाहून भविष्यात अप्पर कडवा धरण विषयाचा संघर्ष अधिक पेटणार असल्याचे संकेत प्रशासनाला दिसून आले आहेत.

2004 पासून अप्पर कडवा धरणाला विरोध होत असताना इतका अट्टहास का केला जातो असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. बळजबरीने जमीन घेतल्यास आम्ही सर्व बाधित शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशी खंत येथील शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

आमच्या शेतीच्या बदल्यात आम्हाला दुसरीकडे शेतीच द्यावी आम्हाला मोबदला नको आहे. कारण प्रकल्पाला शेती दिली तर आम्ही भुमिहीन होऊ म्हणुन अधिकाऱ्यांनी लेखी द्यावे नाहीतर शेतकऱ्यांचे संगोपन करा, तरच मोजणी करा असा इशारा देखील यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

स्थानिक आमदार आमच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. इगतपुरी तालुक्यातील टाकेद खुर्द, घोरपडे वाडी, बाघशिंघवे, आधारवड, घोडेवाडी, ठाकूरवाडी, अधरवड, बारीशिंगवे, भोईरवाडी, वासाळी, आणि खेड ही गावे पेसा मध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असल्याची भावना आहे.

या पंचक्रोशीतील अनेक कुटुंबाचा रोजगार जाऊ शकतो. कुटुंबासमोर उदर निर्वाहाचा मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे. जवळ्पास 665 हेक्टर शेत जमिनीचे क्षेत्र बाधित होणार आहे. त्यामुळे आम्हाला शासनाचा मोबदला नको अन् धरणही नकोत. अशी स्पष्ट भूमिका इगतपूरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे.

खरंतर इगतपूरी तालुक्यात दारणा, भावली, भाम, मुकणे, वैतरणा, कडवा अशी छोटी मोठी जवळपास 16 धरणे असुन आहेत. आणि आणखी हे सतरावे धरण नको. इतकी धरणे असूनही आमचा घसा कोरडाच असतो. धरण उशाला अन् कोरड घशाला अशी आमची अवस्था असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहे.

त्यामुळे बारसू प्रमाणेच इगतपुरी येथील कडवा धरणाचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी थेट आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काळात प्रशासन देखल घेते की बारसू येथील कारवाई सारखी थेट कारवाई सुरू करते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.