AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Rain : उद्या आठवडे बाजार बंद, नाशिकसाठी लष्कर अलर्ट मोडवर; 5 तालुक्यांमध्ये हाय टेन्शन

भारतीय हवामान खात्याने (IMD) नाशिकमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 7 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, दिंडोरीसह ग्रामीण भागात अतिवृष्टी होऊ शकते.

Nashik Rain : उद्या आठवडे बाजार बंद, नाशिकसाठी लष्कर अलर्ट मोडवर; 5 तालुक्यांमध्ये हाय टेन्शन
nashik rain updateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 06, 2026 | 4:33 PM
Share

Nashik Rain Update : सध्या मुंबई, कोणक, पुणे, नाशिक या भागात तुफान पाऊस सुरू आहे. मुंबईत तर जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात ढगफुटी होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन नाशिक जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. ढगफुटी झालीच तर बचावकार्य करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. तसेच खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाची तयारी काय आहे, याबाबत सविस्तर सांगितले. तसेच नागरिकांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

5 तालुक्यांतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी

भारतीय हवामान खात्याने (IMD) नाशिकमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 7 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, दिंडोरीसह ग्रामीण भागात अतिवृष्टी होऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी या 5 तालुक्यांतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच या भागातील आठवडे बाजारही बंद ठेवण्यात येणार आहेत. तशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

सप्तशृंगी मंदिरही उद्या बंद राहणार

तसेच, शेतकऱ्यांनी उद्या शेतात जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान उद्या बंद ठेवण्यात येणार आहे. सप्तशृंगी परिसरातही अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सप्तशृंगी मंदिरही उद्या बंद राहणार आहे. पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा यासाठी प्रशासनाच्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. JCB, Poclain आणि इतर यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. गरज भासल्यास मदतीसाठी लष्करालाही सतर्क करण्यात आले आहे.

आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे

दरम्यान, नाशिकमधील संभाव्य ढगफुटी लक्षात घेता तेथील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच फारच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ