AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Rain Alert : रात्रभर झोप नाही, ढगफुटीसारखा पाऊस सुरू, नाशिककर दहशतीत, घोंगावतयं मोठं संकट

नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी. ढगफुटीसदृश पावसाच्या इशाऱ्याने नागरिक दहशतीत. त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद, तर भंडारदरा परिसरात पर्यटन बंदी लागू. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे, घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

Nashik Rain Alert : रात्रभर झोप नाही, ढगफुटीसारखा पाऊस सुरू, नाशिककर दहशतीत, घोंगावतयं मोठं संकट
नाशिकमध्ये आज ढगफुटीचा इशारा,नागरिक दहशतीत
| Updated on: Jul 07, 2026 | 8:42 AM
Share

संपूर्ण राज्यात पावसाचा जोर काय असून तीन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने जराही विश्रांती घेतलेली नाही. याचदरम्यान हवामान विभागाने आज त्र्यंबकेश्वर व नाशिक परिसरासाठी ढगफुटीसदृश पावसाचा इशारा जारी केला आहे. मध्यरात्रीपासून नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात संततधार पावसाची हजेरी सुरू झाली असून हळूहळू पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. नाशिककरांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. शहराला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगफुटीचा अंदाज वर्तवण्यात आल्याने नाशिककर दहशतीत असून बाहेर पडणं टाळा, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. मध्यरात्रीनंतर त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरात पावसाचा जोर आणखी वाढला असून त्र्यंबकेश्वरच्या मेटघर किल्ला परिसरातील सुमारे 100 नागरिकांचे रात्री सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं.

मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला. हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही धरणांतून नियंत्रित पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं आहे. नाशिकमधील  पावसाच्या संभाव्य इशाऱ्यामुळे सर्वत्र आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.

शहरातं 60 मिमी पावसाची नोंद

नाशिक शहरासह आज त्र्यंबकेश्वरमध्येही पावसाचा जोर वाढला आहे. काल रात्रीपासून त्र्यंबकेश्वर आणि परिसरात संततधार पाऊस सुरू आहे . नाशिक शहरात आज सकाळपर्यंत 60 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.आज दुपारपर्यंत त्र्यंबकेश्वर आणि नाशिक मध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना घरातच राहण्याचं , अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

भंडारदरा परिसरात निसर्ग पर्यटनास बंदी

दरम्यान नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट असल्याने नगर-नाशिक सीमेवर असलेल्या भंडारदरा परिसरात निसर्ग पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. सततचा मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सांदण व्हॅली , कोकणकडा, रतनगड, अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई शिखर हे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे. तसेच रिव्हर्स वॉटरफॉलसह सर्व साहसी पर्यटन उपक्रमांवरही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना भंडारदरा परिसरात प्रवेश मिळणार नाही. भंडारदरा परिसरात पावसाची संततधार सुरू झाली असून आदेशाचे काटेकोर पालन करावे अशा सूचना वनविभागाने दिल्या आहेत.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता

दरम्यान पुण्यातही पावसाचा जोर वाढला आहे. खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत आहे. खडकवासला धरण जलाशय आज 62 % टक्के क्षमतेने भरलं आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता खडकवासलातून काही तासात विसर्ग करण्याची शक्यता आहे. पार्जन्यमानाच्या परिस्थितीनुसार कधीही धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची दाट शक्यता आहे. सर्वांनी योग्य ती खबरदारी आणि दक्षता घेण्याचे आवाहन धरण प्रशासनाने केलं आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे