नाशिकमध्ये 901 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक जिल्ह्यात सध्या 901 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती बुधवारी जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

नाशिकमध्ये 901 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
संग्रहित छायाचित्र.


नाशिकः नाशिक जिल्ह्यात सध्या 901 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती बुधवारी जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 3 लाख 99 हजार 314 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 901 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये दहाने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 641 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 76, बागलाण 6, चांदवड 29, देवळा 13, दिंडोरी 34, इगतपुरी 6, कळवण 16, मालेगाव 11, नांदगाव 5, निफाड 160, पेठ सिन्नर 181, सुरगाणा 1, त्र्यंबकेश्वर 4, येवला 63 अशा एकूण ६०५ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 268, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 22 तर जिल्ह्याबाहेरील 6 रुग्ण असून असे एकूण 901 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 8 हजार 856 रुग्ण आढळून आले आहेत.

नगरच्या कचाट्यात

अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांमागे चिंतेचा भुंगा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर आणि नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील तब्बल 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये 13 ऑक्टोबरपर्यत कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र, यामुळे नाशिकरांची चिंता वाढली आहे. कारण नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत 200 च्या जवळपास रुग्ण वाढत आहेत. सिन्नर तालुक्यातील नागरिकांचा नगरशी सातत्याने संबंध येतो. त्यामुळे येथील रुग्ण वाढत असल्याची शंका आहे.

नवरात्रोत्सवात नियम कडक

कोरोना काळात वणीच्या सप्तशृंगीगडावरील मंदिर 24 तास खुले राहणार आहे. मात्र, भाविकांना पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास मिळवण्यासाठी कोरोनाचे दोन लसीचे डोस घेतल्याचा प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे.

इतर बातम्याः

आमचा राम राम घ्यावा, मान्सून परतीच्या प्रवासावर; उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

भूमाफिया रम्मीला बेड्या; नाशिकमधल्या आनंदवली खून प्रकरणी कारवाई, 30 लाख रुपये अन् 10 गुंठे जमिनीची होती सुपारी

महापालिका निवडणुकीचे बिगुल; नाशिकमध्ये प्रभाग रचनेचा नारळ फुटला; 15 दिवसांत आराखडा सादर करण्याचे आदेश

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI