नाशिक-हिंगोलीतील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादीत इन्कमिंग, पवार, पाटील, भुजबळांच्या उपस्थितीत प्रवेश

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज सटाणा व हिंगोली शहरातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.

नाशिक-हिंगोलीतील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादीत इन्कमिंग, पवार, पाटील, भुजबळांच्या उपस्थितीत प्रवेश

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज सटाणा व हिंगोली शहरातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. (Activists of various parties from Nashik-Hingoli join NCP, In presence of Ajit Pawar, Jayant Patil, Chhagan Bhujbal)

हिंगोलीचे आमदार राजू नवघरे व सटाणाचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पुढाकाराने चंद्रकांत दळवी, अशोक दळवी, प्रल्हाद इंगोळे, नानाराव जामगे, दिलीप पाटील, मनोज सोनावणे, श्रीपाद कायस्य, नितिन सोनावणे, जीवराज चौधरी, आनंद सोनावणे आदींनी पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण उपस्थित होते.

वंचित आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchi Bahujan Aaghadi) प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे (Anand Chandanshive ) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आधी पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांच्या बरोबर सलगी त्यानंतर आज शहरातील विविध विकासकामांच्या निमित्ताने नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी यांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली.

बहुजन समाज पार्टीतून आनंद चंदनशिवे यांनी वंचित बहुजन आघाडी प्रवेश केला होता. त्यानंतर ते वंचितचे प्रदेश प्रवक्ते म्हणून कार्यरत होते. मात्र आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ते वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.

आनंद चंदनशिवे 2017 च्या महापालिका निवडणुकीत, दोन नगरसेवकासह निवडून आले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्याविरोधात शहर उत्तर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यात चंदनशिवे यांना 27 हजार मते मिळाली होती.

दरम्यान, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी जर पक्षात प्रवेश केला तर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ नक्कीच वाढणार आहे. सध्या सोलापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केवळ चार नगरसेवक असल्याने, आगामी पालिका निवडणुकीत सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इतर पक्षातल्या नेत्यांना पक्ष प्रवेश देण्याचे धोरण अवलंबिले आहे.

इतर बातम्या

कोव्हिडनंतर रोजीरोटीचा फार मोठा प्रश्न, त्याला तोंड देऊ शकलो नाही तर मोठे संकट निर्माण होईल: मुख्यमंत्री

(Activists of various parties from Nashik-Hingoli join NCP, In presence of Ajit Pawar, Jayant Patil, Chhagan Bhujbal)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI