AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का, आधी 12 आता 10 माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार?; नाशिकचं राजकीय समीकरणच बदलणार?

नाशिक महापालिकेतील सध्याची सदस्य संख्या 133 आहे. नाशिक महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपचे महापालिकेत 67 नगरसेवक आहेत.

ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का, आधी 12 आता 10 माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार?; नाशिकचं राजकीय समीकरणच बदलणार?
ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का, आधी 12 आता 10 माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार?; नाशिकचं राजकीय समीकरणच बदलणार?Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 23, 2022 | 8:53 AM
Share

नाशिक: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यापासून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का बसण्यास सुरुवात झाली आहे. आधी 12 माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि नाशिकचे संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची चिन्हे आहेत. ठाकरे गटाचे आणखी 10 नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. तसं झाल्यास ठाकरे गटाकडे 12 नगरसेवकच उरणार आहेत. त्यामुळे नाशिकचं राजकीय समीकरणच बदलणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

नाशिकचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांच्यानंतर ठाकरे गटाचे आणखी 10 माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सिडको, सातपूर, नाशिकरोड विभागातील माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. नागपूर अधिवेशन सोहळ्या दरम्यानच हा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा हादरा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाऊसाहेब चौधरी यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यापूर्वी ठाकरे गटाच्या 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे नाशिक महापालिकेतील ठाकरे गटाची सदस्य संख्या 34 वरून 22 झाली होती. आता पुन्हा 10 माजी नगरसेवक ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे नाशिक महापालिकेतील संख्याबळ 34 वरून थेट 12 वर येणार असल्याचं चित्रं आहे.

या दहाही माजी नगरसेवकांचा प्रवेश सोहळा नागपूर अधिवेशना दरम्यानच होणार आहे. मात्र हा प्रवेश कधी आणि कुठे होणार? कुणाच्या उपस्थिती होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला जाणार की हे माजी नगरसेवकच नागपूरला येणार? तसेच प्रवेश करू इच्छिणारे ते दहा नगरसेवक कोण? याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

नाशिक महापालिकेतील सध्याची सदस्य संख्या 133 आहे. नाशिक महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपचे महापालिकेत 67 नगरसेवक आहेत. तर शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून शिवसेनेची सदस्य संख्या 34 आहे. आता त्यातून 22 नगरसेवक शिंदे गटात जात असल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.

या राजकीय घडामोडींमुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमधील राजकीय समीकरणे पुरते बदलून जाणार आहे. तसेच ठाकरे गटाला नाशिकमधील आपलं वर्चस्व कायम राखण्यासाठी या निवडणुकीत सर्वस्व पणाला लावावं लागणार आहे.

महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल

भाजप 67 शिवसेना 34 काँग्रेस 6 राष्ट्रवादी 6 मनसे 5 इतर 3

Follow Us
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?