पोलिसांचं हे पथक लई भारी, ‘दुचाकी’ ची कारवाई सुसाट…

नाशिक मधील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांची उकल करण्यासाठी नाशिक शहर पोलीसांनी 12 जुलै 2022 ला मोटार सायकल चोरी प्रतिबंधक पथकाची स्थापना केली होती.

पोलिसांचं हे पथक लई भारी, 'दुचाकी' ची कारवाई सुसाट...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 2:39 PM

नाशिक : दुचाकी चोरीला गेली तर ती परत मिळू शकते याची शास्वती तुम्हाला कुणी दिली तर त्यावर विश्वास ठेवणार नाही. त्याचं कारणही अगदी तसेच आहे. पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दिली तर परत मिळत नाही असा अनुभव अनेकांचा आहे. मात्र, या बाबीला नाशिकच्या पोलीसांनी छेद दिला आहे. नाशिक शहर पोलीसांनी (Nashik CIty Police) याबाबत एका विशेष पथकाची स्थापना काही दिवसांपूर्वी केली होती. त्याच पथकाने धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने 12 जुलै ला पोलीस आयुक्त (Commissioner of Police) जयंत नाईकनवरे यांनी मोटार सायकल चोरी प्रतिबंधक पथकाची (Motorcycle Theft Prevention Squad) स्थापना केली होती. त्या पथकाची धुरा पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्यावर सोपवली होती. या पथकाची स्थापना करण्याचा उद्देश यशस्वी होतांना दिसून येत आहे.

नाशिक मधील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांची उकल करण्यासाठी नाशिक शहर पोलीसांनी 12 जुलै 2022 ला मोटार सायकल चोरी प्रतिबंधक पथकाची स्थापना केली होती.

या पथकाने आत्तापर्यंत चोरीला गेलेल्या 22 लाख 70 हजार रुपये किमतीच्या 66 दुचाकीचा छडा लावलेला असून 15 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

हे सुद्धा वाचा

मोटार सायकल चोरी प्रतिबंधक पथकामध्ये दहा पोलीस कर्मचारी आणि एक अधिकारी अशी या पथकाची रचना असून दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करणे असा उद्देश आहे.

नाशिक शहर हद्दीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांबरोबरच ग्रामीण भागातील आणि जिल्हाबाहेरील गुन्हे उघडकीस आणण्यात या पथकाला यश आले असून शहरात पहिल्यांदाच अशी मोठी कारवाई झाली आहे.

यामध्ये कमी किमतीत दुचाकी मिळत असल्याने नागरिक चोरीची दुचाकी घेत असल्याचा निष्कर्ष पोलीसांच्या तपासात आला आहे, त्यामुळे नागरिकांनी चोरीच्या दुचाकी खरेदी करू नये असे आवाहन केले आहे.

याशिवाय चोरीची मालमत्ता म्हणजेच दुचाकी खरेदी कुणी केल्यास त्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी दिला आहे.

11 पोलिसांचे असलेले मोटार सायकल चोरी प्रतिबंधक पथक हे तक्रारदारांची मने जिंकण्यासाठी यशस्वी होत आहे. चोरीला गेलेल्या दुचाकी परत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मिळणार असल्याने तक्रारदार पोलीसांचे आभार मानत आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.