AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केजरीवाल जेवढं काम करतात तेवढं काम आमचा…, दीपक केसरकर यांची टीका

प्रतापगडी यांच्यासारख्या माणसांना काहीही बोलण्याची सवय आहे.

केजरीवाल जेवढं काम करतात तेवढं काम आमचा..., दीपक केसरकर यांची टीका
दीपक केसरकर यांची टीका Image Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Oct 26, 2022 | 5:00 PM
Share

नाशिक : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेत कोणी बदल केले. तरुणांना कोणी प्रोत्साहन दिले. याचा विचार अरविंद केजरीवाल यांनी करावा. केजरीवाल जेवढे काम करतात, तेवढे काम आमचा पालकमंत्री करतो. अशी कामाची तुलना दीपक केसरकर यांनी अरविंद केजरीवाल यांच्याशी केली.

दीपक केसरकर म्हणाले, कुणाला मुख्यमंत्री करायचं हा त्यांचा पक्षाचा विषय आहे. त्यांना विरोधी पक्षात बसण्याची संधी दिली आहे. त्यांनी ते काम करावं. आम्ही जनतेसाठी कामं करत आहोत. त्यामुळे आम्हीच सत्तेत राहू.

शंभूराज देसाई इतके कमी 15 वर्ष का म्हणाले, मला माहीत नाही. आम्ही जास्त काळ सत्तेत राहू, असा विश्वासही दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. श्रीकांत शिंदे हे राज ठाकरे यांना भेटले. म्हणजे युती होईल, असा अर्थ घेऊ नये. त्याबद्दल निर्णय झाल्यास अधिकृत घोषणा होईल.

अयोध्येला जाणे म्हणजे प्रभाव पाडण्यासाठी नसते. श्रीराम मंदिर उभारणी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. बाळासाहेबांच्या नावाने राज्य करताना अयोध्येत जाणाऱ्या भाविकांची निवासस्थानाची व्यवस्था व्हायला हवी, असे वाटते.

प्रतापगडी यांच्यासारख्या माणसांना काहीही बोलण्याची सवय आहे. बाळासाहेबांचे स्वप्न आम्ही पूर्ण करतोय. गेल्या सरकारमध्ये राजकारण करताना सर्वसामान्य नागरिक भरडला जात होता.

दिवाळी गोड करण्यासाठी 400 रुपयांचे शिधा पाकीट 100 रुपयांत आम्ही दिले. शेतकरी नुकसानीचे पंचनामे सॅटेलाईटने होणार आहेत. त्यामुळं नुकसान झाल्यास त्याची भरपाई नक्की मिळणार आहे. यापूर्वीसुद्धा राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मदत केली, याची आठवण दीपक केसरकर यांनी करून दिली.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत