‘विश्वासघात झाला… विश्वासघात… रश्मी वहिनी आता घराबाहेर पडा’; भास्कर जाधव यांची साद अन् काळजात कालवाकालव

नाशिकमध्ये अनंत कान्हेरे मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ठाकरे गटाची सभा पार पाडली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी दमदार भाषण केलं. त्यांच्या भाषणाआधी आमदार भास्कर जाधव यांनी रश्मी ठाकरे यांना बाहेर पडण्यासाठी भावनिक साद घातली.

'विश्वासघात झाला... विश्वासघात... रश्मी वहिनी आता घराबाहेर पडा'; भास्कर जाधव यांची साद अन् काळजात कालवाकालव
Bhaskar jadhav Emotional Speech on Rasmi Thackeray in Nashik Sabha
Follow us
| Updated on: Jan 24, 2024 | 3:26 PM

नाशिक : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना ठाकरे गटाची सभा पार पडली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत भाजपवर आसुड ओढलं. ठाकरेंची तोफ धडाडण्याआधी फायरब्रँड नेते भास्कर जाधव यांनी भावनिक भाषण केलं होतं. विश्वासघात झालाय, आपल्या पक्षप्रमुखाला गादीवरून खाली ओढलंय. आता बाहेर पडायची वेळ आलीये असं म्हणत भास्कर जाधवांनी रश्मी ठाकरेंना साद घातली.

काय म्हणाले भास्कर जाधव?

उद्धव ठाकरे यांना आवडणार नाही पण आज मी रश्मी ठाकरेंवर भाषण करणार आहे. गेले अनेक दिवस आपल्या माणसांवर अन्याय होत आहे. मात्र या सगळ्यात रश्मी ठाकरे या जराही डगमगल्या नाहीत ना त्यांचा तोल ढळला नाही. याआधी शिवसेनेच्या सभांमध्ये व्यासपीठावर एका बाजूला बाळासाहेबांच्या रूपाने धगधगतं अग्निकुंड असायचं तर दुसऱ्या बाजूला चंद्राप्रमाणे शांत माँसाहेब बसलेल्या असायच्या. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद गेलं, आदित्य ठाकरेंवर आरोप झाले तरीही मी त्यांना डगमगलेलं पाहिलं नाही. अनेक संकट आलीत पण माँसाहेबांसारख्याच रश्मी ठाकरे लढत राहिल्या असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. यावेळी रश्मी ठाकरेसुद्धा भावुक झालेल्या पाहायला मिळालं.

हिंदू धर्माचा सर्वात जास्त अपमान या केंद्र सरकारने केला- भास्कर जाधव

हिंदू धर्माचा सर्वात जास्त अपमान या केंद्र सरकारने केला. शंकराचार्य यांचं योगदान काय, असा प्रश्न विचारला जातो. लघू, सूक्ष्म आणि मध्यम मंत्री असा प्रश्न विचारत आहे? आपण पिसे काढली. तो बामलाव्या (रामदास कदम) आज अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचं म्हणत भास्कर जाधव यांनी नारायण राणे आणि कदम यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, काँग्रेसच्या नेत्याने आदित्य ठाकरे यांना सांगितलं, की या चाळीस कुत्र्यांनी तुमच्या वडिलांना घेरलं आणि तुम्ही लढला म्हणून तुम्ही मला आवडता. पत्रकार मला विचारत आहेत की तेजस ठाकरे आरतीला बसले होते. ते कधी राजकारणात उतरणार आहेत. यावर त्यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत मला माहिती नाही पण त्यांना जेव्हा वाटेल त्यावेळी ते गरूड झेप घेतील. कारण तो वाघाचा बछडा असल्याचं भास्कर जाधव म्हणाले.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.