AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, बडा नेता एकनाथ शिंदेंच्या गळाला

मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचा बडा नेता उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, बडा नेता एकनाथ शिंदेंच्या गळाला
| Updated on: May 22, 2025 | 9:48 PM
Share

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळलं होतं, या निवडणुकीत महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा परभाव झाला, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीचे तीन घटक पक्षा भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाचे मिळून तब्बल 232 उमेदवार विजयी झाले. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला तर दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे, महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये विशेष: भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे.

या पक्ष गळतीचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, यातील काही जणांनी भाजपमध्ये तर काही जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर देखील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. दरम्यान आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

नाशिकच्या येवला तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे, विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आहेत. ते आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुक्तागिरी बंगल्यावर उद्याच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. दराडे यांच्यासह त्यांचे समर्थक असलेले ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दराडे यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लवकरच घोषणा होण्याची शक्यात आहे. या पार्श्वभूमीवर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का असू शकतो. पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान हे उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?