AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राऊतच्या टीकेला त्याचा मालक तरी भीक घालतो का?’, नितेश राणेंची खोचक टीका

भाजप आमदार नितेश राणे यांनी अतिशय खोचक शब्दांमध्ये संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्याला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी राऊतांवर सडकून टीका केली.

'राऊतच्या टीकेला त्याचा मालक तरी भीक घालतो का?', नितेश राणेंची खोचक टीका
| Updated on: Feb 06, 2024 | 3:50 PM
Share

मनोहर शेवाळे, Tv9 प्रतिनिधी, मालेगाव | 6 फेब्रुवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच कोकण दौरा केला. हा दौरा पूर्ण झाल्यानंतर ते वंदे भारत एक्सप्रेसने मुंबईला आले. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हाक दिली. मी मोदींना शत्रू मानत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण तरीसुद्धा त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील मोदींवर टीका केली. त्यांच्या टीकेला भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं . यावेळी त्यांनी अतिशय खोचक शब्दांत राऊतांवर निशाणा साधला.

“संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाला आळशी कसं बनवलं ह्याचं उत्तम विश्लेषण मोदींनी केलं. त्याची मिरच्या काँग्रेसच्या कामगाराला झोंबल्या. तुझा मालक पूर्ण कोकण दौऱ्यात मोदींचं कौतुक करत आहे. उद्धव ठाकरे हा पलटी मारण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून भाजपासोबत येण्यासाठी आतुर आहे की नाही ते सांगावं.तुझा मालक आणि मालकीण वंदे भारतने मुंबईला गेले. ती मोदींजींची देण आहे. राऊतच्या टीका टिपण्णीला त्याचा मालक तरी भीक घालतो का?”, अशा खोचक शब्दांत नितेश राणे यांनी टीका केली.

‘तुझ्या सारखी खिचडी चोरी मोदींनी केली नाही’

“निलेश पराडकर आणि संजय राऊत यांचा काय संबंध ह्याचं पण उत्तर द्यावं. महाविकास आघाडीच्या काळात गुंडांना कोण घेऊन फिरत होतं ह्याचा आम्ही अल्बम दाखवतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कृषीमंत्री असताना किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे देखील राऊत यांनी सांगावे. तुझ्या सारखी खिचडी चोरी मोदींनी केली नाही. गरिबांना अन्न दिलं. मागील 10 वर्षे नोकऱ्या देण्याचं काम मोदी सरकार करत आहे. तुझ्यासारखं कुटुंबाचा विचार मोदींनी केला नाही. तुझा मालक आणि तुझे गुंडासोबतचे हनिमूनचे फोटो आम्ही व्हायरल करतो. महाविकास आघाडीचा पोपट मेलेला आहे. उबाठाला कशी भीक दिली जाते ते समजेल”, असा घणाघात नितेश राणे यांनी केला.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेबाबत नितेश राणे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “विजय वडेट्टीवार यांना सरकार बदललं ह्याची माहिती नसेल. सकाळी उठून कडक चहा घ्या आणि शुद्धीवर या”, असा टोला नितेश राणे यांनी लगावला. तसेच “आमदार रोहित पवार हा शरद पवार गटाचा पप्पू आहे”, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.