जानोरी गावाकडून विकासासह उपक्रमशीलतेला प्राधान्य; पालकमंत्री भुजबळांच्या हस्ते दोन व्यापारी संकुलांच्या इमारतींचे लोकार्पण

जानोरी गाव हे नेहमीच विकासाला आणि उपक्रमशीलतेला प्राधान्य देणारे असे गाव आहे, अशा भावना जानोरी ग्रामपंचायत येथील व्यापारी संकुलांच्या इमारतींच्या लोकार्पण प्रंसगी छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

जानोरी गावाकडून विकासासह उपक्रमशीलतेला प्राधान्य; पालकमंत्री भुजबळांच्या हस्ते दोन व्यापारी संकुलांच्या इमारतींचे लोकार्पण
Chhagan Bhujbal
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 5:18 PM

नाशिक : जानोरी गाव हे नेहमीच विकासाला आणि उपक्रमशीलतेला प्राधान्य देणारे असे गाव आहे, अशा भावना जानोरी ग्रामपंचायत येथील व्यापारी संकुलांच्या इमारतींच्या लोकार्पण प्रंसगी राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत. (Chhagan Bhujbal Inaugurates two commercial complex buildings in Janori, Nashik)

दिंडोरी तालुक्यातील ग्रामपंचायत जानोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व्यापारी संकुल या दोन इमारतींचे लोकार्पण पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, दिंडोरी पंचायत समितीच्या सभापती कामिनी चारोस्कर, कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, दिंडोरी उपविभागीय अधिकारी संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, जानोरी ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, प्रशासक तथा विस्तार अधिकारी आण्णा गोपाळ आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जानोरी ग्रामपंचायतीने ग्रामनिधी योजनेच्या माध्यमातून व्यापारी संकुल इमारत उभारली आहे. यासाठी 38 लाख रुपये इतका खर्च झाला असून त्यात आठ गाळे काढण्यात आले आहेत. या गळ्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होण्यास निश्चितच उपयोग होणार असल्याचे, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने धरणात पाणी कमी आहे. पाणी टंचाईची समस्या जिल्ह्यावर असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन करत कोरोनापासून आपलं कुटुंब, आपलं गाव, आपला तालुका सांभाळा म्हणजेच जिल्हा आणि राज्य सांभाळलं जाईल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत एकही रुग्ण सापडणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असे सांगून पालकमंत्री भुजबळ म्हणाले, आएसओ मान्यता प्राप्त जानोरी ग्रामपंचायत नेहमी विकासाला प्राधान्य देणारी आहे. त्यामुळे येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य स्वच्छतेला प्राधान्य देतात.

भुजबळ म्हणाले की, जानोरी गाव भूमीगत गटार योजनेच्या माध्यमातून जोडले गेले असून याठिकाणी सांडपाण्याची प्रक्रिया करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गावात राबवल्या जाणाऱ्या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमाना शुभेच्छा देऊन जानोरी गाव विमानतळाजवळ असल्याने येथील गावकऱ्यांनी शेतीसोबत उद्योगधंद्यानाही प्राधान्य द्यावे.

व्यापारी संकुलाने जानोरीच्या विकासात भर : नरहरी झिरवाळ

जानोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व्यापारी संकुल या दोन्ही व्यापारी संकुलामुळे जानोरीच्या विकासात भर पडली आहे. तसेच वळण योजनांमुळे पहिल्या टप्प्यात वाघाड धरण भरते. या योजनेचा परिसरातील शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकदरे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

या कार्यक्रमात पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते कोरोनाकाळात चांगली कामगिरी करणाऱ्या आशा सेविकांना दोन हजारांच्या धनादेशाचे वितरण करुन सत्कार करण्यात आला.

इतर बातम्या

अनिल परब आणि मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्याचीही चौकशी सुरू; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

राज ठाकरे आणि चंद्रकांतदादा एकमेकांना भेटण्याची शक्यता; दोन्ही नेते शासकीय विश्रामगृहात

कट्टरवाद्यांना बच्चू भाऊंचा घरचा आहेर, नाशिकच्या ‘त्या’ हिंदू-मुस्लिम लग्नाला पाठिंबा, धर्माच्या ठेकेदारांना तंबी

(Chhagan Bhujbal Inaugurates two commercial complex buildings in Janori, Nashik)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.