आनंदवार्ताः नाशिकमध्ये कोरोना रुग्णांत घट; आकडा हजाराच्या खाली

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी चक्क हजारांच्या खाली आली असून, सध्या जिल्ह्यात 917 रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

आनंदवार्ताः नाशिकमध्ये कोरोना रुग्णांत घट; आकडा हजाराच्या खाली
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 6:46 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी चक्क हजारांच्या खाली आली असून, सध्या जिल्ह्यात 917 रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका कमी झाला असून, तूर्तात तरी दिलासा मिळाला आहे. (Decrease in corona patients in Nashik; The number is below a thousand)

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 3 लाख 98 हजार 611 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 917 रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 89 ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 626 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 42, बागलाण 19, चांदवड 24, देवळा 29, दिंडोरी 30, इगतपुरी 8, कळवण 8, मालेगाव 13, नांदगाव 12, निफाड 126, पेठ 1, सिन्नर 227, त्र्यंबकेश्वर 5, येवला 84 अशा एकूण ६२८ पॉझिटीव्ह रुग्णांचा समावेश आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २५९, मालेगांव महापालिका क्षेत्रात 19 तर जिल्ह्याबाहेरील 11 रुग्ण असून एकूण 917 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 8 हजार 154 रुग्ण आढळून आले आहेत.

चिकुन गुन्याचे रुग्ण वाढले

नाशिकमध्ये चिकुन गुन्याचे रुग्ण वाढले आहेत. सध्या सातशेहून अधिक चिकुन गुन्याचे रुग्ण आहेत. सप्टेंबर महिन्याच्या 14 तारखेपर्यंत शहरात डेंग्यूचे 140 नवे रुग्ण सापडले आहेत, तर चिकुन गुन्याचे 95 नवे रुग्ण सापडले आहेत. ऑगस्ट महिन्यात 311 डेंग्यूचे रुग्ण सापडले होते. तर चिकुन गुन्याचे 210 रुग्ण सापडले होते. नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. कधी भुरभुर पाऊस सुरू असतो. तर कधी सरीवर सरी बरसत असतात. त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये डासांची उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे डेंग्यूची साथ पसरली आहे.

डेंग्यूचे रुग्णही हजाराच्या घरात

नाशिकमध्ये 2017 मध्ये डेंग्यूचे 151 रुग्ण होते, तर चिकुन गुन्याचे 4 रुग्ण होते. 2018 मध्ये डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा 368 वर गेला होता, तर चिकुन गुन्याचे 40 रुग्ण सापडले होते. 2019 मध्ये डेंग्यूचे रुग्ण 177 होते. या वर्षी चिकुन गुन्याच्या रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी होते. फक्त 1 रुग्ण सापडला होता. 2020 मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 115 होती, तर चिकुन गुन्याच्या रुग्णांची संख्या 7 होती. मात्र, 2021 डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसते. सध्या शहरात डेंग्यू आणि चिकुन गुन्याचे रुग्ण हजारोंच्या घरात असल्याचे समजते.

खासगी रुग्णालये भरली

सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीचे रुग्ण वाढले आहेत. अनेक खासगी रुग्णालये हे डेंग्यू तसेच चिकुन गुन्याच्या रुग्णांनी भरली आहेत. बऱ्याच रुग्णालयात रुग्णांसाठी खाटा मिळत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चाच सुरू आहे. मात्र, सध्या तरी नाशिककरांना डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या साथीने हैराण केल्याचे दिसत आहे. महापालिकेने वॉर्डनिहाय फवारणी करावी, डासांच्या उत्पत्ती ठिकाणांवर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (Decrease in corona patients in Nashik; The number is below a thousand)

इतर बातम्याः

भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या; शिवसेना आमदार कांदेंना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीची धमकी

गोदावरी नदीला वर्षातला तिसरा पूर; नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.