AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोदावरी नदीला वर्षातला तिसरा पूर; नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी

नाशिकमध्ये पुन्हा एकदा मंगळवारी (28 सप्टेंबर) गोदावरी नदीला पूर आला आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी आले असून, प्रशासनाने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

गोदावरी नदीला वर्षातला तिसरा पूर; नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी
नाशिकमध्ये गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहचले आहे.
| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 6:23 PM
Share

मनोज कुलकर्णी, नाशिकः नाशिकमध्ये पुन्हा एकदा मंगळवारी (28 सप्टेंबर) गोदावरी नदीला पूर आला आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी आले असून, प्रशासनाने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. (The third flood of the year in Godavari river in Nashik, water up to the waist of Dutondya Maruti)

नाशिकमध्ये 13 सप्टेंबर रोजी गोदावरीला पहिला पूर आला होता. त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा पूर आला. आता आजही पुन्हा एकदा गंगापूर धरणातून विसर्ग सुरू केल्याने हा वर्षातला तिसरा पूर गोदावरीला आला आहे. सध्या नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे आज मंगळवारी दुपारी बारापासून पुन्हा एकदा धरणातून एकूण 3000 क्यूसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे गोदावरी नदी पुन्हा एकदा ओसंडून वाहते आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले असून, नागरिकांनी नदी क्षेत्रात जावू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, आज नाशिकमध्ये पहाटे पावणेचारपासून पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी बाराच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची हजेरी होती. सध्या धरण क्षेत्रातही अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरण समूह भरत आला आहे. त्यातील गंगापूर धरण 100 टक्के भरले आहे. काश्यपी धरण 98 टक्के भरले आहे. गौतमी गोदावरी धरणही 100 टक्के भरले आहे, तर आळंदी धरण 99 टक्के भरले आहे. हवामान विभागाने आज दिवसभर जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे दुपारी बारापासून गंगापूर धरणातून पुन्हा एकदा एकूण 3000 क्यूसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

नाशिकला सावधानतेचा इशारा

मुंबईच्या प्रादेशिक मौसम विज्ञान केंद्राच्या सूचनेनुसार 28 सप्टेंबर रोजी विभागातील नाशिकसह काही जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्व पूर प्रवण क्षेत्रातील गावांनी सावधानतेच्या अनुषंगाने नदी-नाले काठच्या परिसरातील लोकांनी सतर्क राहावे. नदी व धरण पात्रात कोणी उतरू नये. नागरिकांनी आपले पशुधन, वाहने सुरक्षित स्थळी ठेवावीत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले आहे. दरम्यान, गुलाब चक्रीवादळामुळे उत्तर महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपून काढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जळगावला रेड अलर्ट

हस्त नक्षत्राला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी 6 वाजून 42 मिनिटांनी सूर्याने हस्त नक्षात्रात प्रवेश केला. या नक्षत्राचा वाहन घोडा आहे. त्यामुळे खंडित स्वरूपाचा पाऊस होईल. यापूर्वीच्या उत्तरा नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने जोरदार पाऊस झाला, असा अंदाज दाते पंचांगामध्ये वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने जळगावला रेड अलर्ट जारी केल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा आपत्ती विभागाच्या पथकांना दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान सरासरी पेक्षा कमी पावासाची नोंद झाली. मात्र, सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. (The third flood of the year in Godavari river in Nashik, water up to the waist of Dutondya Maruti)

इतर बातम्याः

भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या; शिवसेना आमदार कांदेंना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीची धमकी

कथित धर्मांतरण प्रकरणः नाशिकचा कुणाल उच्चशिक्षित, रशियात एम. डी. मेडिसीन केले पूर्ण; वडील होते लष्करी सेवेत

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.