शांतिगिरी महाराजांचा ‘एकला चलो रे’ चा नारा! महायुतीला नाराजी परवडेल का?

Shantigiri Maharaj Lok Sabha | नाशिकच्या राजकारणातील मोठी अपडेट समोर येत आहे. श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांचे नाव पुढे केल्याने शांतिगिरी महाराज नाराज झाले आहेत. त्यांनी एकला चलो रेचा नारा दिला आहे. पण बाबाजी भक्तगण परिवारातून महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.

शांतिगिरी महाराजांचा 'एकला चलो रे' चा नारा! महायुतीला नाराजी परवडेल का?
Follow us
| Updated on: Mar 13, 2024 | 11:45 AM

चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी, नाशिक | 13 March 2024 : नाशिकच्या राजकीय आखाड्यात आता खरा कस आणि दम लागणार आहे. शांतिगिरी महाराज यांना महायुतीकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी काल नाशिकमधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली. शांतिगिरी महाराज नाराज झाले. त्यांनी एकला चलो रेचा नारा दिला आहे. पण बाबाजी भक्तगण परिवारातून महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.  या निर्णयानंतर नाशिक लोकसभा निवडणुकीत अधिक रंगत येणार आहे.

महाराज निर्णयावर ठाम

नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरण्यावर शांतिगिरी महाराज ठाम आहेत. त्यांना महायुतीकडून तिकीट मिळण्याचा विश्वास होता. त्यासाठी त्यांनी प्रयत्न पण केले. हेमंत गोडसे हे नाशिक मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. नुकत्याच झालेल्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केली. शिंदेंच्या घोषणे नंतर शांतिगिरी महाराज नाराज झाले. त्यांनी तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. शांतिगिरी महाराज मविआ च्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नसल्याचे सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

महाराजांचा मोठा भक्त परिवार

  • शांतिगिरी महाराज हे मुळचे नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव येथील आहेत. ते वेरुळ येथील जनार्धन स्वामींच्या मठात दाखल झाले. येथेच त्यांनी विज्ञान शाखेतून पदवी घेतली. त्यानंतर ते मठाधिपती झाले. या मठाची कोट्यवधींची संपत्ती आहे. देशात 55 हून अधिक मठ आहेत. काही ठिकाणी गुरुकूल आहेत. या मठाकडे शेकडो एकर जमीन आहेत. अनेक एसयुव्ही कार आहेत. शांतिगिरी महाराजांचे छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, नाशिक, धुळे या जिल्ह्यात मोठा भक्त परिवार आहे.
  • महाराजांनी वर्ष 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगर मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 1 लाख 48 हजारं मतं मिळाली होती. निवडणुकीत पराभवानंतर महाराज अनेक वर्षे निवडणुकीपासून दूर होते. पण आता छत्रपती संभाजीनगर ऐवजी महाराज नाशिकच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.