यंदाच्या श्रावणातही त्र्यंबकेश्वरचे मंदिर बंद राहणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

श्रावण महिन्यात शेकडो भाविक त्रंबक नगरीत दाखल होतात. देशाच्या वेगवेगळ्या भागातून भाविक या ठिकाणी येत असतात. भाविकांची गर्दी झाल्यास पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. हा संभाव्य धोका रोखण्यासाठी मंदिर प्रशासनाने कोरोना नियमवलीअंतर्गत लागू केलेले निर्बंध जैसे थे ठेवले आहेत.

यंदाच्या श्रावणातही त्र्यंबकेश्वरचे मंदिर बंद राहणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय
यंदाच्या श्रावणातही त्र्यंबकेश्वरचे मंदिर बंद राहणार
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 9:06 PM

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे टेन्शन कमी झाले आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यामुळे प्रशासनाने सण-उत्सवांतील सावधगिरी कायम ठेवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबक राजांचे मंदिर यंदाच्या श्रावणात देखील बंद असणार आहे. दर सोमवारी होणारी ब्रम्हगिरी प्रदक्षिणा देखील भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्र्यंबक राजांचे मंदिर हे श्रावण महिन्यात विशेष महत्व असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग मानले जाते. (Due to the corona, the temple of Trimbakeshwar will remain closed even in this year’s Shravan)

श्रावण महिन्यात शेकडो भाविक त्रंबक नगरीत दाखल होतात. देशाच्या वेगवेगळ्या भागातून भाविक या ठिकाणी येत असतात. भाविकांची गर्दी झाल्यास पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. हा संभाव्य धोका रोखण्यासाठी मंदिर प्रशासनाने कोरोना नियमवलीअंतर्गत लागू केलेले निर्बंध जैसे थे ठेवले आहेत. याच अनुषंगाने यंदा सलग दुसऱ्या वर्षी श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचे मंदिर प्रशासनाने ठरवले आहे. याच दृष्टिकोनातून भाविकांना आवाहन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात ब्रम्हगिरी प्रदक्षिणा करत असतात. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा ही प्रदक्षिणा बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

त्र्यंबकेश्वरची मोजक्या पुजाऱ्यांच्या हस्ते त्रिकाल पूजा

त्र्यंबकेश्वरचे मंदिर बंद असले तरी श्रावण महिन्यात होणारी त्रिकाल पूजा ही मोजक्या पुजाऱ्यांच्या हस्ते होणार आहे. त्या पूजेमध्ये खंड पडू दिला जाणार नाही. उद्या सायंकाळी भगवान त्र्यंबक राजांच्या पादुकांना कुशावर्तमध्ये स्नान घालून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा होईल, असेही मंदिर प्रशासनाने कळवले आहे.

मंदिर परिसरात शुकशुकाट

गेल्या काही दिवसांपासून मंदिर पूर्णपणे भाविकांसाठी बंद आहे. केवळ कोरोना संसर्ग वाढू नये, याच कारणाने मंदिरामध्ये कोणालाही प्रवेश करू दिला जात नाही. अनेक भाविक मंदिराबाहेरूनच दर्शन घेऊन माघारी फिरत आहेत. आता मात्र भाविकांना मंदिर परिसरात येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या रस्त्यांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मार्गावरही मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. दरम्यान, सलग दुसऱ्या वर्षी श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरला जाता येत नसल्यामुळे भाविक निराश झाले आहेत. कोरोना महामारीच्या संकटातून जगाची लवकर सुटका होऊ दे, असे गाऱ्हाणेही अनेक भाविक घालू लागले आहेत. (Due to the corona, the temple of Trimbakeshwar will remain closed even in this year’s Shravan)

इतर बातम्या

मुंबईत 24 तास ऑफिसेस सुरु ठेवण्याची मुभा, पण वेळेचं नियोजन कसं करायचं? मुख्यमंत्र्यांना सांगितला फॉर्म्युला

जिथे पूर आला तिथेच कोरोनाचं मोठं संकट घोंगावतंय? मुख्यमंत्र्यांचा 6 जिल्ह्यांना थेट अलर्ट

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.