AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेविरोधात लढण्यास सासरा तयार; सूनही म्हणाली, मला संधी दिली तर…; रावेरमध्ये काय घडणार?

जिल्ह्यातील सर्व विरोधक माझ्या विरोधात आहेत. मला त्यांना एकच सल्ला द्यायचा आहे. त्यांनी मला विरोध करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, असं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. तसेच महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा वगैरे काहीही नाही. जागावाटपही अंतिम टप्प्यात आलं आहे. 15 दिवसात जागा वाटपाचा निर्णय होईल, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

सुनेविरोधात लढण्यास सासरा तयार; सूनही म्हणाली, मला संधी दिली तर...; रावेरमध्ये काय घडणार?
raksha khadseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 01, 2024 | 6:33 PM
Share

रवी गोरे, किशोर पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जळगाव | 31 डिसेंबर 2023 : रावेर लोकसभा मतदारसंघात सासरा विरुद्ध सून असा सामना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच राष्ट्रवादीकडूनही त्यांना तिकीट देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. तर दुसरीकडे त्यांचीच सून आणि भाजपच्या रावेरमधील विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनीही तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात सासरा विरुद्ध सून असा सामना रावेरकरांना पाहायला मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे.

नाथाभाऊ काय म्हणाले?

रावेर लोकसभेची जागा एनसीपीला मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. रावेरची जागा लढण्याबाबत मी सुद्धा इच्छुक आहे. रावेरची जागा मिळाली तर माझ्याच नावाचा प्राधान्याने विचार करावा, अशी विनंती मी पक्षाला केली आहे. पक्षानेही मला रावेर लढण्याबाबत सांगितलं आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं.

रक्षा खडसे काय म्हणाल्या?

दरम्यान, विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनीही रावेरबाबत भाष्य केलं आहे. पक्षाने मला पुन्हा संधी दिली तर मी तिसऱ्यांदा खासदारकीची उमेदवार राहणार आहे. रावेरमधून लढण्याची माझी तयारी आहे. शेवटी पक्ष याबाबत काय निर्णय घेईल ते महत्त्वाचं असणार आहे, असं खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.

तर महाजनांच्या पाठी उभे राहू

रावेर लोकसभेसाठी गिरीश महाजन यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. गिरीश महाजन यांचं नाव पुढे येत असेल तर काही हरकत नाही. ते आमचे नेते आहेत. पक्षाने आदेश दिला तर आम्ही सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठी उभे राहू. त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणू, असंही रक्षा खडसे म्हणाल्या.

लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचं आव्हान असलं तरी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वालाच मान्यता मिळाली आहे. जनतेचा विश्वास मोदींसोबत आहेत. त्यामुळेच 2024लाही मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच