AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नदी बुजविण्याचे कुटील कारस्थान उघड; नाशिकमध्ये नालेही केले गिळंकृत

नाशिक (Nashik) जिल्ह्यात चक्क घुबड दरी नदी बुजविण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे शहरातील शेकडो नाले विकासकांनी गिळंकृ केले असून, महापालिकेचे राजीव गांधी भवनच हे चक्क नाल्यावर बांधले गेले आहे.

नदी बुजविण्याचे कुटील कारस्थान उघड; नाशिकमध्ये नालेही केले गिळंकृत
नाशिकमधील घुबड दरी ही नदी भराव टाकून बुजविल्याचा आरोप होत आहे.
| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 6:10 PM
Share

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात चक्क घुबड दरी नदी बुजविण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे शहरातील शेकडो नाले विकासकांनी गिळंकृ केले असून, या प्रकरणी संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Encroachment on the river, throwing stones and soil filled the river basin in Brahmagiri,Nashik)

त्र्यंबकेश्वर जवळच्या पहिने येथे ब्रह्मगिरीच्या डोंगरातून ही नदी वाहते. त्यावर भराव टाकण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने हा भराव वाहून गेला. त्यामुळे नदी बुजविण्याचे कुटील कारस्थान समोर आले आहे. विशेष म्हणजे पाऊस संपल्यानंतर पु्न्हा त्यावर भराव टाकण्याचे काम सुरू झाले आहे. रविवारी सोशल मीडियावर यावरून बरेचे मेसेज फिरले. या नदीवर सिमेंट काँक्रिट करून तिला अंडरग्राउंड करण्यात येत असल्याची चर्चा सुरू होती. याबाबत नागरिकांनी संबंधितांना विचारले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. ब्रह्मगिरी परिसरातून पहिने येथे वाहणारी ही नदी असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. मात्र, प्रशासनाने हा ओहळ असल्याचे सांगत या नसत्या कुटील कारस्थानावर पडदा टाकण्याचे काम सुरू केले आहे. याबद्दल पंचक्रोशीमध्ये संताप आहे.

नाले केले गिळंकृत

नाशिकमधील शेकडो नाले विकासकांनी गिळंकृत केले आहेत. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक नाल्यांचा विषय चर्चेत आहे. यातल्या अनेक नाल्यांवर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. काही ठिकाणी नाले बळकावण्याचे आणि बुजविण्याचे षढयंत्र सुरू आहे. महापालिकेने यातले 63 नाले शोधून काढले आहेत. याचेही झाले असे की, या नाल्यांची महापालिकेच्या 2017 मध्ये केलेल्या शहर विकास आराखड्यात नोंद आहे. त्यामुळे प्रशासन उशिरा का होईना जागे झाले असून, सध्या ज्या नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे, त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत 63 पैकी 22 नाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.

महापालिकेचे गांधी भवन नाल्यावरच

तळे राखणारा पाणी चाखणार या म्हणीप्रमाणे महापालिकेचे राजीव गांधी भवनच हे चक्क नाल्यावर बांधले गेले आहे. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात महापालिकेसमोर तळे साचते. सोबतच पालिकेनेच नाळा बळकावल्याने ती इतरांना काय सांगणार आणि काय कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेपासून फर्लांगभर असलेल्या पोलिस अकादमीजवळून गेलेला नालाही गायब झाला आहे. हा नाला विसे मळ्यातून गंगापूर रोडकडे जायचा. मात्र, तो सुद्धा शोधण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. नाशकातील चोपडा नाला, सरस्वती नाला, वाघाडी नाल्यासह अनेक नाले बुजवले गेलेत. सिडकोतूनही अनेक नाले गायब झाल्याचे समजते. (Encroachment on the river, throwing stones and soil filled the river basin in Brahmagiri Nashik)

इतर बातम्याः

बहुचर्चित कथित धर्मांतरणासाठी परदेशातून फंडिंग; नाशिकच्या तरुणाच्या खात्यात तब्बल 20 कोटी जमा

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा जबाब नोंदवला; नाशिक पोलिसांच्या ऑनलाइन प्रश्नांना दिली खोचक उत्तरे!

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.