AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड फहीम खानचा आणखी एक मोठा कारनामा समोर

दोन दिवसांपूर्वी नागपुरात मोठा राडा झाला होता, या घटनेतील मास्टरमाईंड असलेल्या फहीम खानचा आता आणखी एक मोठा कारनामा समोर आला आहे.

मोठी बातमी! नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड फहीम खानचा आणखी एक मोठा कारनामा समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 20, 2025 | 3:47 PM
Share

सोमवारी रात्री नागपुरात जोरदार राडा झाला, औरंगजेबच्या कबरीच्या वादातून हा राडा झाला.  दोन गट आमने-सामने आले. त्यानंतर दगडफेक झाली, जाळपोळीच्या घटना घडल्या. या घटनेत मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान या प्रकरणाचा मास्टरमाइंड हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष फहीम खान असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. त्यानंतर फहीम खान याच्यासह 50 जणांवर पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक देखील करण्यात आली आहे. फहीम खानवर नागपुरात जमाव जमावल्याचा आरोप आहे. दरम्यान फहीम खानचा आता आणखी एक कारनामा समोर आला आहे.

नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड असलेल्या फईम खान याने पाच महिन्यांपूर्वी मालेगाव शहरात मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचं कार्यालयल सुरू केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्याने हे कार्यालय सुरू केलं होतं. मात्र त्याने हे कार्यालय चक्क मालेगाव शहरातील महापालिकेच्या घरकुल योजनेतील एका इमारतीमध्ये  सुरू केल्याचं आता समोर आलं आहे. त्याने मालेगावात अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची देखील नेमणूक केली होती. त्याच्या पक्षानं विधानसभा निवडणुकीमध्ये मोहम्मद फरान यांना उमेदवारी दिली होती. त्यांना या निवडणुकीमध्ये 597 मते मिळाली होती.

मात्र निवडणूक होताच पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते गायब झाले आहेत. दरम्यान महापालिकेच्या घरकुल योजनेतील एका इमारतीमध्ये त्याने कार्यालय सुरू केल्याचं समोर आलं त्यानंतर आता नागपूर दंगलीचा मास्टरमाईंड असलेल्या फईम खानचं मालेगावात अजून काही कनेक्शन व संबंध आहेत काय? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

कोण आहे फहीम खान? 

नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष आहे. 38 वर्ष वय असलेल्या फहीम खानचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे. त्याने लोकसभेची देखील निवडणूक लढवली होती. नागपूरमध्ये जमाव जमावल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी त्याला अटक केलं असून, त्याच्यासह पन्नास जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दगडफेकीच्या घटनेत मोठं नुकसान झालं आहे. काही पोलीस देखील जखमी झाले आहेत.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ