मनमाड : बाईकस्वारांचे वाढते अपघात (Accident) पाहता मनमाड शहरामध्ये एक खास मोहिम राबवली जातंय. शहर पोलिस व इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमानाने अमृत महोत्सवानिमित्त शहरात अपघात रोखण्यासाठी हेल्मेट (Helmet) वाटप केले जात आहे. अप्पर पोलिस अधीक्षक व मनमाड (Manmad) विभागाचे पोलिस उपअधिक्षक समिरसिंह साळवे, पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते व कंपनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा मोफत हेल्मेट वाटप उपक्रमाला सुरूवात करण्यात आली.