सशक्त नाशिक जिल्ह्यासाठी साथ द्या; पालकमंत्री भुजबळांचं नागरिकांना आवाहन

कोरोनाच्या परिस्थितीवर पूर्णपणे मात करून सशक्त नाशिक जिल्हा उभा करणे हे आपले पहिले उद्दिष्ट असणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांची भूमिका अतिशय महत्वाची असेल, असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

सशक्त नाशिक जिल्ह्यासाठी साथ द्या; पालकमंत्री भुजबळांचं नागरिकांना आवाहन
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 8:45 PM

नाशिक : कोरोनाच्या परिस्थितीवर पूर्णपणे मात करून सशक्त नाशिक जिल्हा उभा करणे हे आपले पहिले उद्दिष्ट असणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांची भूमिका अतिशय महत्वाची असेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. घोटी ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. (give Support to make strong Nashik; Chhagan Bhujbal’s appeal to citizens)

यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, सरपंच अलका जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडखे, संदीप गुळवे, बाळासाहेब गाढवे, आरोग्य उपसंचालक पी.डी. गांडाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खैरे, डॉ. संजय सदावर्ते आदी उपस्थित होते.

नाशकात 29 ऑक्सिजन प्लांट

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिशय भयंकर ठरली यामध्ये ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. या परिस्थितीत शासन- प्रशासनाने ऑक्सिजनचे यशस्वी नियोजन केले. एरव्ही जिल्ह्यात 80 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता होती. ती आता मोठ्या प्रमाणात वाढली त्यातून नाशिक जिल्ह्यात सर्व रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 29 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट बसवण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयांना 24 तास ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. कोरोना काळात डॉक्टर परिचारिकांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

400 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती करणार

ते म्हणाले की, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने तिप्पट ऑक्सिजनची निर्मिती करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार 350 मेट्रिक टन ची व्यवस्था केली असून 400 मेट्रिक टन ऑक्सिजनची आपण निर्मिती करणार आहोत. ऑक्सिजन जनरेशन प्लांट सोबतच लिक्विड ऑक्सिजनचीही व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे साथरोगांच्या काळासह इतर काळातही रुग्णालयात नियमित ऑक्सिजन मिळणार आहे. जिल्ह्यातील दहापेक्षा अधिक प्लांट सुरू करण्यात आले असून इतर प्लांटही लवकरच सुरू करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

नियमांचे पालन करण्याचे आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन सर्व उपाययोजना करत आहे. त्यात नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना करताना ते पुढे म्हणाले की, नाशिक मुंबई रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली आहे. या नाशिक मुंबई रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून रस्त्याच्या मजबुतीकरण करण्यासाठी मागणी केली आहे. तसेच अधिकाऱ्यांसोबत बैठक देखील घेतली असून १५ ऑक्टोबर पर्यंत रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत शासन मार्गक्रमण करत विकासाची कामे मार्गी लावण्यास प्राधान्य देत असल्याचेही भुजबळांनी सांगितले.

आमदार हिरामण खोसकर म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या अडचणींचा सामना करत आहोत. याबाबत शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्मिती करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्मिती करण्यात येत असल्याचे सांगत घोटी येथील रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

इतर बातम्या

जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकाऱ्यांचं काय होणार?, अभ्यासगट लवकरच मंत्रीमंडळाला अहवाल सादर करणार

आता OBC आरक्षण अध्यादेश राज्यपालांनी रोखल्याची चर्चा, कोश्यारी विरुद्ध ठाकरे सरकार पुन्हा आमने-सामने

(give Support to make strong Nashik; Chhagan Bhujbal’s appeal to citizens)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.