Gold Rate Today | जळगावात सोन्याच्या दरात 4 हजारांची घसरण, जाणून घ्या महाराष्ट्रातले आजचे दर!

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढले होते. एकीकडे शेअर बाजार कोसळला होता. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. त्यांनी आपला सारा मोर्चा सोन्याकडे वळवला होता. त्यामुळे सोन्याच्या दरात अचानक वाढ झाली होती.

Gold Rate Today | जळगावात सोन्याच्या दरात 4 हजारांची घसरण, जाणून घ्या महाराष्ट्रातले आजचे दर!
सोन्याचे दर
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 4:59 PM

नाशिकः सुवर्णनगरी अशी ख्याती असलेल्या जळगावमध्ये (Jalgaon) बुधवारी 16 मार्च रोजी सोन्याच्या दर 4 हजार 200 रुपयांची घसरण पाहायला मिळाली, तर चांदीचे दर किलोमागे 3 हजार रुपयांनी कमी झाले. नाशिकसह (Nashik) महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरातही सोन्याचे (Gold) दर घसरले. नाशिकमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅम मागचे दर 51650 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅम मागचे दर हे 47350 रुपये नोंदवले गेले. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढले होते. एकीकडे शेअर बाजार कोसळला होता. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. त्यांनी आपला सारा मोर्चा सोन्याकडे वळवला होता. त्यामुळे सोन्याच्या दरात अचानक वाढ झाली होती. मात्र, आता रशिया आणि युक्रेन युद्धाची धग कमी होताना दिसतेय. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सोन्याचे दर कमी होताना दिसून येतायत. लगीनसराईच्या तोंडावर हा नागरिकांना मोठा दिलासा आहे, असेच म्हणावे लागेल.

कसे घसरले दर?

नाशिकमध्ये 7 मार्च रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर 49480 रुपये होते. या दरात घसरण होऊन आज बुधवारी हे दर 47350 वर स्थिरावले आहेत. तर 7 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 53950 रुपये होते. आज हे दर 51650 वर स्थिरावल्याचे जाणवले. 14 मार्चपासून सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळते आहे. नाशिकमध्ये 14 मार्च रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर 48200 रुपये होते. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 52570 होते. त्यानंतर हे दर सातत्याने घसरत आहेत.

युद्धाचे परिणाम…

गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात सोन्याचे दर उतरताना दिसत आहेत. विशेषतः रशिया आणि युक्रेन युद्धाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार इतर क्षेत्राकडेही वळताना दिसत आहेत. त्याचा परिणाम सोन्याचे दर घसरताना दिसत आहेत. येणाऱ्या काळात हे दर अजून घसरू शकतात. लगीनसराईत हा मोठा दिलासा आहे, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर

मुंबई – 51600

पुणे – 51650

नाशिक – 51650

नागापूर – 51680

22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर

मुंबई – 47300

पुणे – 47350

नाशिक – 47350

नागापूर – 47380

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

Video | ‘अभिव्यक्ती’ म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नव्हे, संविधानाचा गैरअर्थ नको; उज्ज्वल निकमांकडून कोर्टाचे स्वागत

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.