AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीक मागणाऱ्या दिव्यांग मुलानं जेवण मागितलं, रागवलेल्या हॉटेल चालकाचं माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य

दिव्यांग मुलानं खाण्यासाठी अन्न मागितले असता रागवलेल्या हॉटेल चालकानं त्याच्या अंगावर गरम पाणी ओतलं आहे, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल आहे. Hotel Owner Beggar Boy

भीक मागणाऱ्या दिव्यांग मुलानं जेवण मागितलं, रागवलेल्या हॉटेल चालकाचं माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Dec 09, 2020 | 1:58 PM
Share

नाशिक: समाजातील माणुसकी कमी होत असल्याच्या घटना आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहेत. माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नाशिक शहरात  दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास घडली आहे. भूकेने व्याकूळ झालेल्या भीक मागणाऱ्या दिव्यांग मुलानं खाण्यासाठी अन्न मागितले असता रागवलेल्या हॉटेल चालकानं त्याच्या अंगावर गरम पाणी ओतलं आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ( Hotel owner throw hot water on differently abled beggar boy)

मुलगा गंभीर जखमी

दिव्यांग मुलगा भीक मागून पोटाची भूक भागवत असतो. सोमवारी रात्रीच्या सुमारास तो शहरातील एका हॉटेलमध्ये खाण्यासाठी जेवण मागण्यासाठी गेला. यामुळे राग आलेल्या हॉटेल चालकानं त्याच्या अंगावर गरम पाणी ओतलं. या घटनेमध्ये दिव्यांग मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ( Hotel owner throw hot water on differently abled beggar boy)

मुलाच्या अंगावर गरम पाणी ओतल्याची माहिती मिळताच शहरातील सामाजिक संघटना त्याच्या मदतीला धाऊन आल्या.  जखमी झालेल्या मुलाला जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अश्विनी आढाव आणि सुशील जाधव हे सामाजिक कार्यकर्ते त्या दिव्यांग मुलाच्या मदतीला धावून आले. सामाजिक कार्यकर्त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात हॉटेल चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

माणुसकी संपत चालल्याची भावना

भीक मागून पोटाची भूक भागवणाऱ्या मुलाच्या अंगावर उकळत पाणी फेकल्याची घटना, माणुसकीला काळिमा फासणारी आहे. समाजातील माणुसकी संपत चालल्याचे हे लक्षण आहे, असं सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी आढाव म्हणाल्या. या घटनेतील आरोपींवर कारवाई करुन तातडीनं न्याय देण्याची मागणीही त्यांनी केली. ( Hotel owner throw hot water on differently abled beggar boy)

संबंधित बातम्या :

किरकोळ वादातून तरुणाच्या अंगावर कार घालून हत्या, तीन तासात आरोपींना बेड्या

नाशिक शहर आणि जिल्ह्यातील ५ महत्वपूर्ण घडामोडी

किरकोळ वादातून तरुणाच्या अंगावर गाडी घालून हत्या, पोलिसांनी तीन तासात आरोपींना ठोकल्या बेड्या

( Hotel owner throw hot water on differently abled beggar boy)

Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी