नाशिक शहर आणि जिल्ह्यातील ५ महत्वपूर्ण घडामोडी

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये नाशिक बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे बाजार समितीचं एकूण साचे चार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

नाशिक शहर आणि जिल्ह्यातील ५ महत्वपूर्ण घडामोडी
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 10:55 AM

नाशिक: मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई-नाशिक-नागपूर बुलेट ट्रेनची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. 741 किलोमीटर लांबीचा हा हाय स्पीड रेल्वे मार्ग केंद्र सरकारने प्रस्तावित केला आहे. यामध्ये नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन पूर्वप्राथमिक चाचणी करणार आहे. या आधी समृद्धी महामार्ग आणि आता प्रस्तावित बुलेट ट्रेनमुळे मुंबई-नाशिक-नागपूरचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. (5 important developments in Nashik city and district)

भारत बंदमुळे नाशिक बाजार समितीचं मोठं नुकसान

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये नाशिक बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे बाजार समितीचं एकूण साचे चार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. बाजार समितीचे संचालक आणि सदस्यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला होता. काल दिवसभर बाजार समिती बंद असल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे.

पाणी प्रश्नाबाबत महापौरांकडे सर्वपक्षीय बैठक

सिडकोवासियांच्या पाणी प्रश्नाबाबत महापौरांकडे सर्वपक्षीय बैठक होणार आहे. सिडकोला आता मुकणे धरणासह गंगापूर धरणातूनही पाणी पुरवठा केला जाणार आहे. पाणी पुरवठा होत नसल्यानं सिडकोच्या नगरसेवकांनी आंदोलन केलं होतं. महापौरांच्या आदेशानंतर सिडको परिसरात पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटण्याची शक्यता आहे.

दिंडोरीत शॉर्ट सर्किटमुळे आग, 6 दुकानं भस्मसात

नाशिकच्या दिंडोरीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 6 दुकानं भस्मसात झाली आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. सुदैवानं या आगीत जीवितहानी झाली नाही. पालखेड रोडलगत असलेल्या दुकानांना पहाटेच्या सुमारास ही आग लागली होती. त्यानंतर अग्नीशमन विभागाच्या 2 तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली.

दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला

बागलाण तालुक्यातील किकवारी शिवारात एका बिबट्यानं दोन दुचाकीस्वारांवर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात दुचारीस्वार जखमी झाले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यानंतर धास्तावलेले दोघे आपला जीव वाचवण्यासाठी धावत सुटले. त्यावेळी बिबट्यानंही काही अंतरापर्यंत त्यांचा पाठलाग गेला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

संबंधित बातम्या :

नाशिकमधल्या विमानसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक आणि पर्यटनप्रेमी मैदानात

नाशिक महापालिकेत कमबॅक करण्यासाठी मनसे सज्ज!, नवीन वर्षात राज ठाकरेंचा नाशिक दौरा

5 important developments in Nashik city and district

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.