AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : नाशिकच्या गुलाबीगावात पुराच्या पाण्यात 2 तरूण वाहून गेले, शोध सुरू!

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरूणांची नावे सुरेश कडाळी आणि प्रभाकर पवार अशी आहेत. हे तिघेही सोमवारी कामानिमित्त बुबळी येथे गेले होते. रात्री अकरा वाजेच्या दरम्यान वापस येत असताना जामनेमाळच्या फरशी पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून मोटार सायकलने जाताना तिघेही पडले.

Nashik : नाशिकच्या गुलाबीगावात पुराच्या पाण्यात 2 तरूण वाहून गेले, शोध सुरू!
नाशिकमधील अनेक पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी, कोणती पर्यटनस्थळं बंद, कोणती सुरू? वाचाImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 11:10 AM
Share

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्हात गेल्या काही तासांपासून जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. यामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालयं. सुरगाणा येथील अनेक शेतकऱ्यांचे पिकांसह शेतही वाहून केले आहेत. इतकेच नाही तर पुराच्या पाण्यात दोन तरूणही (Young) वाहून गेल्याची माहिती मिळते आहे. सुरगाण्याच्या गुलाबीगाव अर्थात भिंतघर येथील दोन युवक पुरात वाहून गेल्याची घटना समोर आलीय. पुरामुळे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान (Damage) झाले आहे. शिवाय शेतामध्ये जनावरेही अडकून पडली आहेत.

पुराच्या पाण्यात वाहून गेले 2 तरूण

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरूणांची नावे सुरेश कडाळी आणि प्रभाकर पवार अशी आहेत. हे तिघेही सोमवारी कामानिमित्त बुबळी येथे गेले होते. रात्री अकरा वाजेच्या दरम्यान वापस येत असताना जामनेमाळच्या फरशी पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून मोटार सायकलने जाताना तिघेही पडले. यात सुरेश कडाळी व विजय वाघमारे हे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले तर मागे बसलेला प्रभाकर पवार सुदैवाने बचावला आहे.

ग्रामस्थांनी सुरू केला तरूणांचा शोध

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून भरपाई देण्याची मागणी आता जोर धरू लागलीयं. भिंतघर येथील वाहून गेलेल्या तरूणांचा शोध घेतला जात असून पुलापासून काही अंतरावर मोटरसायकल व छत्र्या आढळल्या आहेत. मात्र दोघे अद्यापही सापडले नाहीयंत. नातेवाईक चिंतेत असून दोघांचा शोध सुरू आहे. नातेवाईकांसह ग्रामस्थ देखील पुरात वाहून गेलेल्या या तरूणाचा शोध घेत आहेत.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.