AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | कैद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यावर जीव घेणा हल्ला, कर्मचारी गंभीर जखमी, नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील धक्कादायक प्रकार…

आर्श्चयकारक बाब म्हणजे या एका पोलिस कर्मचाऱ्यावर तब्बल दहा ते बारा कैद्यांनी मिळून हल्ला केलायं. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील धक्कादायक प्रकारनंतर भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. कारागृहात आता पोलीस कर्मचारीच सुरक्षित नसल्याचे बोलले जात आहे.

Nashik | कैद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यावर जीव घेणा हल्ला, कर्मचारी गंभीर जखमी, नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील धक्कादायक प्रकार...
| Edited By: | Updated on: Aug 18, 2022 | 10:41 AM
Share

नाशिक : नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक बातमी पुढे येते आहे. बंदी वादी कैद्यांनी मोठा हल्ला करत पोलिस कर्मचाऱ्याला गंभीर जखमी केले. पोलीस कर्मचाऱ्यावर दहा ते बारा कैद्यांनी मिळून जीव घेणा हल्ला केलायं. या घटनेनंतर आता पोलिस (Police) दलात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच या कैद्यांना पुण्याच्या येरवडा जेलमधून नाशिकच्या जेलमध्ये आणण्यात आले होते. आज सकाळी हा हल्ला (Attack) झाल्याची माहिती मिळते आहे. या हल्ल्यानंतर पोलिस कर्मचारी गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

येरवडा जेलमधून नाशिकच्या जेलमध्ये बंदी वादी कैदी एक महिन्यांपूर्वीच दाखल

पुण्याच्या येरवडा जेलमधून नाशिकच्या जेलमध्ये बंदी वादी कैदी एक महिन्यांपूर्वीच आणण्यात आले होते. ज्या कैद्यांनी पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केलायं हे सर्व कैदी बंदी वादी असल्याची देखील माहिती मिळते आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव प्रभूचरण पाटील असल्याचे सांगितले जात आहे. सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून ते गंभीर जखमी झाले आहेत.

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील धक्कादायक प्रकारानंतर भीतीचे वातारण

आर्श्चयकारक बाब म्हणजे या एका पोलिस कर्मचाऱ्यावर तब्बल दहा ते बारा कैद्यांनी मिळून हल्ला केलायं. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील धक्कादायक प्रकारनंतर भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. कारागृहात आता पोलीस कर्मचारीच सुरक्षित नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, या बंदी वादी कैद्यांनी पोलिस कर्मचाऱ्यावर नेमका कोणत्या कारणावरून हल्ला केलायं, हे अध्याप कळू शकले नाहीयं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?