Malegaon Bomb blast : यासाठीच घडवण्यात आला स्फोट, 16 वर्षानंतर NIA ने केला मोठा खुलासा; अंतिम सुनावणीत काय केला युक्तीवाद

Final Hearing Court : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास हाती घेतल्यानंतर अंतिम सुनावणीत मोठा दावा केला आहे. 2008 मध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. 16 वर्षानंतर याप्रकरणी अंतिम सुनावणी सुरु आहे.

Malegaon Bomb blast : यासाठीच घडवण्यात आला स्फोट, 16 वर्षानंतर NIA ने केला मोठा खुलासा; अंतिम सुनावणीत काय केला युक्तीवाद
मालेगाव बॉम्ब स्फोट
Follow us
| Updated on: Jul 26, 2024 | 10:04 AM

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणा आता अंतिम सुनावणी सुरु आहे. 16 वर्षानंतर गुरुवारी अंतिम सुनावणीला सुरुवात झाली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास हाती घेतल्यानंतर याप्रकरणात मोठा खुलासा केला आहे. देशात आणि राज्यात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी, दोन समाजात फुट फाडण्यासाठीच हा स्फोट घडवून आणल्याचे एनआयने स्पष्ट केले. गुरुवारी फिर्यादींच्या वतीने अंतिम सुनावणीत बाजू मांडण्यात आली. याप्रकरणात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींविरोधात खटला सुरु आहे.

16 वर्षांपूर्वी स्फोट

मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी अंजुमन चौक ते भीकू चौक या दरम्यान असलेल्या शकील गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनीसमोर स्फोट झाला होता. रात्री 9:35 मिनिटांनी हा स्फोट झाला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर 101 जण जखमी झाले होते.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत आरोपी

फिर्यादींनी याप्रकरणात माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची मोटारसायकल या स्फोटासाठी वापरल्याचा आरोप केलेला आहे. आरोपी समीर कुलकर्णी यांच्याविरोधातील खटल्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. प्रज्ञा ठाकूर आणि पुरोहित यांच्यासह या प्रकरणात मेजर रमेश उपाध्याय (सेवानिवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चुतर्वेदी यांचा समावेश आहे. सर्वांविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा (UAPA) आणि भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत खटला सुरु आहे.

जातीय तेढ निर्माण करण्यासाठीच स्फोट

विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ आणि अनुश्री रसाळ यांनी एनआयएची बाजू मांडली. रमजान महिना सुरु होता आणि नवरात्रोत्सव सुरु होणार होता. नागरिकांमध्ये दहशत माजवण्याच्या, जीवित आणि मालमत्तेच्या हानीच्या उद्देशाने सूत्रधारांनी हा स्फोट घडवला. जातीय तेढ निर्माण करणे. राज्याची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आणण्याच्या उद्देशाने हा स्फोट घडवल्याचा युक्तीवाद एनआयएने केला आहे.

काश्मीरमधून आरडीएक्स

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) सुरुवातीला तपास केला. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेकडे तपास सोपवण्यात आला. एटीएसच्या तपासाच्या आधारे , आरोपी पुरोहितने या स्फोटासाठी काश्मीरमधून आरडीएक्स आणल्याचा युक्तीवाद फिर्यादी पक्षाने कोर्टात केला. आरडीएक्सचा हा साठा पुरोहितने त्याच्या घरात ठेवल्याचा दावा फिर्यादी पक्षाने केला आहे.

'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'.
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली.
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी.
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा.
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात.
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल.
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.