AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सभापती असलेले अद्वय हिरे यांचं बाजार समितीचं सदस्यत्वच रद्द, राजकीय वर्तुळात खळबळ

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे यांचे सदस्यत्व जिल्हा उपनिबंधकांनी रद्द केले आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम, १९६३ च्या कलम २४ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सभापती असलेले अद्वय हिरे यांचं बाजार समितीचं सदस्यत्वच रद्द, राजकीय वर्तुळात खळबळ
| Updated on: Dec 24, 2024 | 10:36 PM
Share

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांचे बाजार समितीतील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय नुकताच जिल्हा उपनिबंधकांनी दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आलं आहे. बाजार समितीच्या कार्यकाळात जास्तीत जास्त दिवस अनुपस्थित असल्याने तक्रारदाराने केलेले तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधकांनी अद्वय हिरे यांच्याविरोधात निकाल दिला आहे. अद्वय हिरे बाजार समितीचे सभासदत्व रद्द होणे म्हणजे हा त्यांच्यासाठी मोठा धक्काच मानला जातोय.

उपनिबंधकांनी निकालात काय म्हटलं आहे?

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे हे बाजार समितीच्या दिनांक २८/११/२०२३, २७/०१/२०२४, २६/०३/२०२४, २५/०५/२०२४, १८/०७/२०२४ आणि २६/०८/२०२४ अशा एकूण ७ मासिक सर्वसाधारण सभांना गैरहजर असल्याचे सिध्द होत आहे. सदर बाबत महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनिमयन) अधिनियम, १९६३ मधील कलम २४ ची तरतूद प्रभावित होते, असं उपनिबंधकांनी निकालाच्या विश्लेषणात म्हटलं आहे.

“सदरचा गैरहजर असल्याचा कालावधी हा ३० दिवसांपेक्षा अधिक असून रजेच्या मंजूरी संदर्भात महाराष्ट्र कृषी उत्पत्र खरेदी विक्री (विकास व विनियमन) नियम, १९६७ चे नियम ९३ मधील तरतुदीनुसार विहीत कार्यपद्धतीचे अनुपालन झालेले नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे अद्वय प्रशांत हिरे यांना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनिमयन) अधिनियम, १९६३ मधील कलम २४ मधील तरतुदीनुसार मालेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे समिती सदस्यत्व रद्द करणेबाबत खात्री झालेली असल्याने मी खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे”, असं उपनिबंधकांनी म्हटलं आहे.

नेमकं आदेशात काय म्हटलं आहे?

“महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनिमयन) अधिनियम, १९६३ मधील कलम २४ मधील तरतुदीनुसार अद्वय प्रशांत हिरे यांचे कृषी उत्पन्न बाजार समिती, मालेगांव, जि. नाशिक या बाजार समितीचे सदस्यत्व रद्द करीत आहे. सदर आदेश आज दिनांक २३ डिसेंबर, २०२४ रोजी माझे सही आणि शिक्क्यानिशी पारीत केला आहे”, असं उपनिबंधकांनी आदेशात म्हटलं आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.