AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोल्डन ऑफर, सोनं पुन्हा स्वस्त; जाणून घ्या नाशिक सराफातले भाव!

नाशिकच्या (Nashik) सराफा बाजारपेठेत मंगळवारी (28 सप्टेंबर) सोने-चांदी स्वस्त झाले. 24 कॅरेट सोन्याचे (Gold) दर दहा ग्रॅममागे 46250 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 45000 नोंदवले.

गोल्डन ऑफर, सोनं पुन्हा स्वस्त; जाणून घ्या नाशिक सराफातले भाव!
संग्रहित छायाचित्र
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Sep 28, 2021 | 5:20 PM
Share

नाशिकः नाशिकच्या (Nashik) सराफा बाजारपेठेत मंगळवारी (28 सप्टेंबर) सोने-चांदी स्वस्त झाले. 24 कॅरेट सोन्याचे (Gold) दर दहा ग्रॅममागे 46250 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 45000 नोंदवले. (Minor fluctuations in gold prices in Nashik,The price of 24 carat gold per ten grams is 46250)

तरुण वर्गामध्ये एकदम झपाट्याने गुंतवणुकीसाठी लोकप्रिय झालेल्या सोन्याच्या दरात सप्टेंबर महिन्यात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळते आहे. रोज शंभर ते दोनशे रुपयांनी भाव वाढतात किंवा उतरतात असेच चक्र या महिन्यात तरी सुरू आहे. नाशिकच्या सराफा बाजारात सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46600 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 44500 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे 61800 रुपये नोंदवले. मंगळवारी या दराच मोठी चढउतार पाहायला मिळाली नाही. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46250 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 45000 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे 61000 रुपये होते. कालच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्याचे दर 350 रुपयांनी स्वस्त झाले. 22 कॅरेट सोने 500, तर चांदी 800 रुपयांनी स्वस्त झाल्याचे दिसले. दरम्यान, सोन्या-चांदीच्या या दरावर तीन टक्के जीएसटी लागू असेल. दरम्यान, पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

‘गुगल पे’वर ठेवा साठवून

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

दसऱ्याकडे डोळे

सराफा व्यापाऱ्यांचे डोळे आता येणाऱ्या दसऱ्याकडे लागले आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून दसऱ्याकडे पाहिले जाते. अनेकजण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट, नाणे खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. यंदा ऑगस्टपर्यंत नाशिकमध्ये म्हणावा तसा पाऊस नव्हता. मात्र, सप्टेंबरमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दसऱ्याला जोरदार उलाढाल होण्याचे संकेत आहेत.

रोखीच्या व्यवहारांसाठी KYC ची मागणी

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.

नाशिकच्या सराफा बाजारात मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46250 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 45000 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे 61000 रुपये होते. सोन्या-चांदीच्या या दरावर तीन टक्के जीएसटी लागू असेल. – गिरीश नेवासे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन (Minor fluctuations in gold prices in Nashik,The price of 24 carat gold per ten grams is 46250)

इतर बातम्याः

3 हजार हेक्टवरील पीक उद्धवस्त; नाशिकमधल्या 4816 शेतकऱ्यांचे नुकसान

ब्यूटी पार्लर चालक महिलेवर नाशकात बलात्कार, पॅरोलवर सुटलेल्या आरोपीकडून चाकूच्या धाकाने अत्याचार

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!