भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार, संदीप देशपांडेची घोषणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट झाल्यानंतर मनसे-भाजप युती होणार असल्याची जोरदार चर्चा होती. (sandeep deshpande)

भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार, संदीप देशपांडेची घोषणा
sandeep deshpande

नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट झाल्यानंतर मनसे-भाजप युती होणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, त्याला पूर्णविराम मिळाला आहे. नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे. (mns to contest alone in nashik corporation election, says sandeep deshpande)

संदीप देशपांडे आणि मनसे नेते अमित ठाकरे हे आज नाशिकच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी संदीप देशपांडे यांनी मीडियाशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे नाशिकमध्ये कमबॅक करेल. गेल्या पाच वर्षात नाशिककरांची पुरती निराशा झाली आहे. दत्तक घेऊ ही योजनाही फेल गेली आहे, असा टोला संदीप देशपांडे यांनी भाजपला लगावला.

युतीचा प्रस्ताव नाही

नाशिकमध्ये मनसे स्वबळावरच लढणार आहे. सध्या तरी आमच्याकडे कुणाकडूनही युतीचा प्रस्ताव आलेला नाही, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी नाशिकचं मनापासून संगोपन केलं आहे. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा संगम घडवून पुन्हा एकदा आम्ही नाशिकमध्ये कमबॅक करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

मनसेची पूरग्रस्तांना मदत

कोकणातील वादळग्रस्तांसाठी केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पॅकेज जाहीर केलं तरी लोकांपर्यंत मदत पोहोचत नाही, असं सांगतानाच आता पूरग्रस्तांसाठी मनसे 100 ते सव्वाशे ट्रक मदत साहित्य पाठवत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मदतीआधीच शिवसेनेची जाहिरात

शिवसेनेने मदत करण्याआधीच जाहिरात केली आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कोकणाला फटका बसला आहे. मदत करण्यासाठी आपल्याकडे काहीच एसओपी नाही. हे प्रशासनाचं अपयश आहे. प्रशासन कोणत्याही प्रकारचे धोक्याचे इशारे लोकांना देत नाही, असं ते म्हणाले.

पैसा खाण्याचा नवा मार्ग

निष्क्रिय लोकांच्या हाती सत्ता असल्यानेच कोणतंही नियोजन नाही. व्हिजन नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नद्यांवर भिंत बाधणार असल्याचं सांगितलं. म्हणजे पैसे खाण्याचा हा नवा मार्गच आहे, असं सांगतानाच आम्ही ब्लू प्रिंट तयार करणार असल्यांचही ते म्हणाले. (mns to contest alone in nashik corporation election, says sandeep deshpande)

 

संबंधित बातम्या:

अमित ठाकरे नाशिकमध्ये दाखल; पदाधिकाऱ्यांशी वन-टू-वन चर्चा करणार

राज ठाकरे पुन्हा पुण्याच्या दौऱ्यावर, तीन दिवस तळ ठोकणार; 9 मतदारसंघांचा घेणार आढावा

पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

(mns to contest alone in nashik corporation election, says sandeep deshpande)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI