निकाल लागून वर्ष, नियुक्त्यांचं काय? ‘मी तहसीलदार, तरीही मी बेरोजगार’ असे फलक घेत नाशिकमध्ये आंदोलन

राज्यसेवा परीक्षेत निवड झालेल्या तरुणांच्या नियुक्त्या रखडल्याने अखेर या भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा संयम संपल्याचं चित्र नाशिकमध्ये दिसलं.

निकाल लागून वर्ष, नियुक्त्यांचं काय? 'मी तहसीलदार, तरीही मी बेरोजगार' असे फलक घेत नाशिकमध्ये आंदोलन
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 6:52 PM

नाशिक : स्पर्धा परीक्षांची जीव तोडून तयारी करणाऱ्या आणि त्यात यश मिळवणाऱ्या तरुणांचा संघर्ष काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. 2019 ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेचा निकाल 19 जून 2020 ला लागला. त्याला आता 1 वर्षे होत आलंय, तरीही अजून या निकालात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अजूनपर्यंत नियुक्तीच झालेली नाही. निवड झालेल्या तरुणांच्या नियुक्त्या रखडल्याने अखेर या भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा संयम संपल्याचं चित्र नाशिकमध्ये दिसलं. या ठिकाणी निवड झालेल्या तरुणांनी ‘मी तहसीलदार, तरीही मी बेरोजगार’ असा फलक हातात धरुन प्रशासनाच्या या गोंधळाचा निषेध केलाय (MPSC exam qualified candidate protest in Nashik against appointment pendency).

‘मी तहसीलदार तरीही मी बेरोजगार’ फलक घेत दिरंगाईबद्दल तरुणांकडून नाराजी व्यक्त

लोकसेवा आयोगाने 2020 या वर्षात घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेत निवड झालेल्या तरुणांनी आज (19 जून) नाशिकच्या शासकीय विश्रामगृह परिसरात राज्य सरकार विरोधात आंदोलन केलं. ‘मी तहसीलदार तरीही मी बेरोजगार’ अशा आशयाचं फलक घेऊन त्यांनी या दिरंगाईबद्दल आपली नाराजी व्यक्त केली.

“मराठा आरक्षणाचं कारण सांगत 413 जणांच्या नियुक्ती टाळल्या”

जवळजवळ 413 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करत या नियुक्ती सरकारने पुढे ढकलल्या, असा आरोप या तरुणांनी केलाय. मात्र सर्व निकाली लागूनही आम्हाला नियुक्ती का दिली जात नाहीये? असा सवाल हे भावी अधिकारी सरकारला विचारत आहेत.

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचं नाशिकमध्ये चूल पेटवून आंदोलन

दरम्यान, वाढत्या महागाईच्या विरोधात नाशिकमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पेट्रोल-डिझेल सोबतच घरगुती गॅसचे देखील भाव गगनाला भिडल्याने काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी चूल पेटवून आंदोलन केले.

हेही वाचा :

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा इंग्रजी पोषण ट्रॅकर अ‍ॅपवर बहिष्कार, अ‍ॅप मराठीतून उपलब्ध करण्याची मागणी

मूळ आराखड्यानुसारच नाशकातील जिल्हा क्रीडा संकुलाचे बांधकाम सुरू करा; पालकमंत्र्यांच्या सूचना

नाशिकच्या ऑक्सिजन गळतीत मुलाचा मृत्यू, सरकारकडून मिळालेले 10 लाख रुपये घेऊन सून पसार, वृद्ध आई-वडिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

व्हिडीओ पाहा :

MPSC exam qualified candidate protest in Nashik against appointment pendency

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.