AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये सीएनजी गॅस दरात पुन्हा भडका, तब्बल 4 रुपये प्रति किलो मागे सीएनजी गॅसचे वाढले दर

गेल्या काही दिवसांपासून सतत सीएनजी गॅस दर वाढ होतयं. सीएनजी गॅस दर वाढत असल्याने वाहन चालकांना मोठा फटका याचा सहन करावा लागतोयं. 91.90 रुपये वरून नाशिकमध्ये आता सीएनजी गॅस 95.90 रुपयांवर पोहचला आहे.

नाशिकमध्ये सीएनजी गॅस दरात पुन्हा भडका, तब्बल 4 रुपये प्रति किलो मागे सीएनजी गॅसचे वाढले दर
सीएनजी पुन्हा महागला!
| Edited By: | Updated on: Aug 03, 2022 | 11:40 AM
Share

नाशिक : महागाई गेल्या काही वर्षांतील सर्वोच्च स्थराला पोहोचली आहे. पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. आता यामध्ये भर पडलीयं ती म्हणजे सीएनजी गॅसची (CNG Rates). नाशिक शहरात सीएनएजीच्या दरात प्रति किलोमागे चार रुपयांची मोठी वाढ करण्यात आलीयं. यामुळेच आता सीएनजीसाठी लोकांना अधिक पैसे (Money)मोजावे लागणार आहेत. नाशिकमध्ये (Nashik) पुन्हा एकदा सीएनजी गॅस दरात मोठी वाढ करण्यात आलीयं. तब्बल 4 रुपये प्रति किलो मागे सीएनजी गॅसचे दर वाढवण्यात आलेत.

सीएनजी गॅस दर वाढत असल्याने वाहन चालकांना मोठा फटका

गेल्या काही दिवसांपासून सतत सीएनजी गॅस दर वाढ होतयं. सीएनजी गॅस दर वाढत असल्याने वाहन चालकांना मोठा फटका याचा सहन करावा लागतोयं. 91.90 रुपये वरून नाशिकमध्ये आता सीएनजी गॅस 95.90 रुपयांवर पोहचला आहे. पेट्रोलच्या आसपासच सीएनजीचे दर पोहचत असल्याने नागरिक संतप्त झाल्याचे चित्र बघायला मिळते आहे. काल मध्यरात्रीपासून सीएनजीचे नवे दर लागू करण्यात आल्याने नागरिकांना मोठा झटका बसलायं.

91.90 रुपये वरून नाशिकमध्ये आता सीएनजी गॅस 95.90 रुपयांवर पोहचला

भारताच्या शेजारी देशांनाही नैसर्गिक वायूच्या वाढलेल्या किमतींचा सामना करावा लागत आहे. वाढलेल्या किमतींमुळे बांगलादेशातील वीज उत्पादनावर परिणाम झाला असून, त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्याचवेळी, नैसर्गिक वायूचा पुरवठा नियमित ठेवण्यासाठी पाकिस्तानने जनतेवर सुमारे $12 अब्जचा कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपीय देशांकडून नैसर्गिक वायूला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने भारतात गॅस आयात करण्यात अडचण येत आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.