नाशिकच्या मासिक पाळी प्रकरणात शिक्षकाला क्लिनचीट, पीडित मुलीची राज्य बाल हक्क आयोगाकडे धाव

पीडित मुलगी राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहे. मासिक पाळीमुळे शिक्षकाने तिला शाळेत वृक्षारोपण करू दिले नाही असा पीडित मुलीने आरोप केलायं. नाशिक जिल्ह्यातील देवगाव आदिवासी आश्रम शाळेत हा सर्व प्रकार घडला होता. मुलीने केलेल्या या आरोपांची चाैकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती.

नाशिकच्या मासिक पाळी प्रकरणात शिक्षकाला क्लिनचीट, पीडित मुलीची राज्य बाल हक्क आयोगाकडे धाव
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 11:02 AM

नाशिक : मासिक पाळी (Menstrual Cycle) सुरु असल्याने एका मुलीला वृक्षारोपण करू न दिल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हात घडला होता. इगतपुरी येथील त्र्यंबक देवागाव आश्रम शाळेत ही घटना घडल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याप्रकरणी चौकशी (Inquiry) करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले. पीडित मुलगी ही बनाव करत केल्याचा अहवाल चौकशीत पुढे आला. परंतू आता पीडित मुलगी राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळते आहे. या प्रकरणानंतर आश्रमशाळेतील सर्वच शिक्षक (Teacher) अडचणीत आले आहेत.

पीडित मुलगी राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करणार

पीडित मुलगी राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहे. मासिक पाळीमुळे शिक्षकाने तिला शाळेत वृक्षारोपण करू दिले नाही असा पीडित मुलीने आरोप केलायं. नाशिक जिल्ह्यातील देवगाव आदिवासी आश्रम शाळेत हा सर्व प्रकार घडला होता. मुलीने केलेल्या या आरोपांची चाैकशी करण्यात आली. याच आरोपाची चौकशी केल्यानंतर आदिवासी विभागाने शिक्षकाला क्लिनचीट दिली आहे. परंतू आता ही विद्यार्थींनी थेट राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहे. यामुळेच हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

आदिवासी विभागाने मुलगी त्या दिवशी शाळेत हजरच नव्हती असे रिपोर्टमध्ये नमूद केले

आदिवासी विभागाने सदर मुलगी त्या दिवशी शाळेत हजरच नव्हती असे रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. याच निर्णयाविरोधात सदर मुलगी आणि काही सामाजिक संघटना आज राज्य बालहक्क आयोगाकडे करणार तक्रार दाखल करणार आहेत. आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणी यांनी सदर प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मीना यांनी शाळेचा हजेरी पट तपासला असता, ज्या दिवशी वृक्षारोपण झाले, त्याच दिवशी म्हणजे 14 जुलै रोजी विद्यार्थिनी शाळेत गैरहजर होती, असे आढळून आले. तसेच ती विद्यार्थिनी जून महिन्यात चार दिवस तर जुलै महिन्यात फक्त तीन दिवस शाळेत उपस्थित होती, असे चौकशीतून उघड झाले आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.