Nashik : नाशिकमध्ये खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने सुरू करण्याचे आदेश, तीन महिने उलटून गेल्याने नागरिक हैराण

इंदिरा नगर येथील रहिवासी सतीश दुसाने यांनी सांगितले की, आमच्या भागात रस्ते खोदून तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. महापालिकेचे अधिकारी कामे सुरू असल्याचे सांगत आहेत.

Nashik : नाशिकमध्ये खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने सुरू करण्याचे आदेश, तीन महिने उलटून गेल्याने नागरिक हैराण
नाशिकमध्ये खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने सुरू करण्याचे आदेशImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 8:05 AM

नाशिक : नाशिक (Nashik) शहर अभियंता यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) नागरिकांना स्वयंपाकाचा गॅस पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MGNL) भूमिगत पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शहरवासीयांनी केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. खोद काम करून तीन महिने झाले तरी अद्याप काम पुर्ण न झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. तसेच आरोग्याचा समस्या देखील लोकांना भेडसावत आहेत.

काम संतगतीने सुरू आहे

इंदिरा नगर येथील रहिवासी सतीश दुसाने यांनी सांगितले की, आमच्या भागात रस्ते खोदून तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. महापालिकेचे अधिकारी कामे सुरू असल्याचे सांगत आहेत. मात्र येथील परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही. विलंबामुळे केवळ आरोग्याच्या समस्याच उद्भवत नाहीत तर अपघात देखील होतात. हे प्रकरण नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. काम सुरू असलेल्या ठिकाणाहून उडणारा चिखल आणि धूळ घरांमध्ये पोहोचत आहे. वृद्धांसाठी समस्या निर्माण होत असून, या समस्यांमुळे वाहनधारकही हैराण झाले आहेत. रस्त्याच्या कडेला चिखल झाला आहे. त्यामुळे अनेक वाहने घसरत आहेत. रोज नागरिकांच्या गाड्या इथून घसरत आहेत. सदरचे काम पावसाळ्यापुर्वी पु्र्ण करावे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा

अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत

राणेनगर सारखे प्रमुख रस्ते जे खोदण्यात आले होते ते मोकळे झाले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी उर्वरित कामे पूर्ण होतील याची खात्री करण्याचे आदेश आम्ही अधिकाऱ्यांना दिले आहेत. अधिकार्‍यांना रस्त्याचे काम किती प्रमाणात करायचे आहे. हे पाहण्यास सांगितले आहे आणि सध्या ते 13.5 किमी पर्यंत काम सुरू आहे. तसेच आकडा वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी सांगितली.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.