AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारती पवार आणि पंकजा मुंडे….; नाशिकच्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis on Nashik Loksabha Election 2024 Bharati Pawar Pankaja Munde : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी पंकजा मुंडे आणि भारती पवार यांचा उल्लेख त्यांनी केलाय. वाचा सविस्तर...

भारती पवार आणि पंकजा मुंडे....; नाशिकच्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस
| Updated on: May 16, 2024 | 5:58 PM
Share

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघाच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीची सभा झाली. मनमाडमध्ये झालेल्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे आणि भारती पवार यांचा उल्लेख केला.भारती पवार, पंकजा मुंडे या दिल्लीला जाणार आहेत. आमदार सुहास कांदे यांचा कार्यसम्राट आहेत, असा उल्लेखही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सुहास कांदेच काम वेगळं आहे. माझा त्यांचा जुना परिचय आहे. खऱ्या अर्थाने जनमाणसात काम करणारे नेते ही त्यांची प्रतिमा आहे, असंही फडणवीस म्हणाले.

फडणवीसांनी काय शब्द दिला?

सुहास कांदे यांनी सांगितलं की 100 वेळा मी उद्धव ठाकरे यांना पाणी प्रश्नांसाठी भेटलो. पण काम झालं नाही. पण तेच शिंदे सरकारने केलं. साडे तीन हजार कोटी विकास कामांसाठी सुहास कांदे यांनी आणलं. मागच्या वेळेस सरावात जास्त लीड मनमाडने दिलं. याही वेळेस लीड देतील. 20 तारखेला निवडणूक होऊ द्या 21 तारखेला मीटिंग लावून तुमचा सगळ्या मागण्यांवर मार्ग काढू. पाण्यासाठी असलेला सगळा नाशिक जिल्ह्यातील संघर्ष मोदींच्या माध्यमातून निकाली काढू, असा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला.

राहुल गांधीच्या बरोबर 24 पक्षांची खिचडी आहे.. त्यांच्याकडे पंतप्रधान कोण होणार हे उमेदवार संगीत खुर्ची खेळून ठरवतील. राहुल गांधी, शरद पवार, उध्दव ठाकरे असे सर्व च म्हणता मी इंजिन आहे. डबे नाही आणि इंजिनमध्ये ड्रायव्हर असतो. मात्र इकडे फकत इंजिन मोदी आहेत आणि तुम्ही डबे आहात…सर्वांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास मोदी करत आहेत. मोदींनी 10 कोटी मुद्राच कर्ज दिलं. बचत गट काढले. 10 कोटी महिलांना रोजगार दिला. प्रत्येकाच्या घरावर सोलर लावून 300 युनिट वीज फ्री मिळणार आहे, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

कांदा प्रश्नावर फडणवीस काय म्हणाले?

कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार आहोत. मनमाडला बायपास मोदींच्या माध्यमातून मिळेल. मनमाड रेल्वेच्या नावाने ओळखल जात, 300 कोटी आपल्या स्टेशनला मिळाले. जगात कोविडची पाचवी लस भारताने बनवली. मोदी हे जगाचे नेते आहेत. जगाची आर्थिक व्यवस्था 5 व्या क्रमांकावर आहे लवकरच ती 3 नंबरवर येईल. भारताकडे कोणाचीही वाकड्या नजरेने बघायची हिंमत नाही. चांद्रयान भारताने पाठवलं आणि पकिसाथन कटोर घेऊन भिक मागतो आहे. मोदींना आशीर्वाद देण्यासाठी भारती ताईंना मत द्या. भारती पवारांना मत म्हणजे मोदींना मत, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.