महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या 200 कंत्राटी कामगारांचे इगतपुरीमध्ये कामबंद आंदोलन, सुविधा देण्याची मागणी

महिंद्रा अंड महिंद्रा कंपनीत 10 ते 15 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सुमारे स्थानिक दोनशे कामगार तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. Igatpuri Mahindra and Mahindra Company

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या 200 कंत्राटी कामगारांचे इगतपुरीमध्ये कामबंद आंदोलन, सुविधा देण्याची मागणी
कामगारांचं आंदोलन
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 12:53 PM

नाशिक: इगतपुरी शहरातील महिंद्रा अंड महिंद्रा कंपनीत 10 ते 15 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सुमारे स्थानिक दोनशे कामगार तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. या कामगारांना कामगार कायद्यानुसार कंपनीकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाही. त्यामुळे या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शनिवार 5 जून पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, कंपनीने आंदोलनाला वाटाण्याच्या अक्षता दाखवत बाहेरील कामगार आणून या सर्व बाहेरील कामगारांची कंपनीतच राहण्या-खाण्याची सोय केल्याने व काम चालू ठेवल्याने स्थानिक कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आंदोलनाविषयीचे निवेदन तहसीलदार व इगतपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. (Nashik Igatpuri Mahindra and Mahindra Company contract workers started agitation for various demands)

स्थानिक कामगारांना त्रास देण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप

सुमारे 200 कामगार गेली दहा ते पंधरा वर्षांपासून कंत्राटद्वारे चार चाकी निर्मिती करणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत काम करत आहेत. परंतु कंपनीने आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. कामगार 5 जूनपासून कंपनीसमोर गेटवर दररोज येतात. परंतु कंपनी व्यवस्थापनाने स्थानिक कामगारांना डावलून नाशिक येथून अन्य कामगारांना आणत आपले काम सुरू ठेवले आहे. सर्व स्थानिक कामगारांना त्रास देऊन कंपनी व्यवस्थापन षडयंत्र रचत आहे, असा आरोप या कामगारांनी केला आहे.

तहसीलदारांना निवेदन

दरम्यान,याप्रकरणी कामगारांनी तहसीलदार कंपनी व्यवस्थापनला त्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कामगारांच्या कामाचा पूर्ण मोबदला मिळावा, ग्रॅज्युईटी मिळावी, क्षमतेपेक्षा जास्त काम करवून घेऊ नये, पगारी सुट्टी देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर सत्यवान वारघडे, चंद्रकांत भागडे, दत्तात्रय चौधरी, धनराज परदेशी, हेमंत पाटें, सोपान चव्हाण, वैभव पवार, प्रकाश गोळे, विश्वास भोईर, गुरुनाथ अवघडे आदींच्या सह्या आहेत.

इगतपुरी तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी

इगतपुरी सहतालुक्यात पावसाच्या जोरदार सरी पाहायला मिळाल्या. आज पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाच्या सरींनी हवेत गारवा पसलाय. त्यामुळे उकाड्याने त्रस्त असणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळालाय. 1 जून पासून आता पर्यंत इगतपुरी तालुक्यात 122 मी. मी. पावसाची नोंद झाली असून पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावलाय.

संबंधित बातम्या

अमावस्येच्या तोंडावर लासलगांव बाजार समितीचा दुसरा ऐतिहासिक निर्णय, 75 वर्षांची परंपरा बंद होणार

नाशिकमधील 1184 वाडे धोकादायक, पावसाळ्यापूर्वी वाडे रिकामे करण्याचा आदेश

(Nashik Igatpuri Mahindra and Mahindra Company contract workers started agitation for various demands)

Non Stop LIVE Update
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.