अमावस्येच्या तोंडावर लासलगांव बाजार समितीचा दुसरा ऐतिहासिक निर्णय, 75 वर्षांची परंपरा बंद होणार

लासलगाव बाजारसमितीनं 4 दिवसात दुसरा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कांदा लिलावात महिलांना संधी दिल्यानंतर आता 75 वर्षांच्या परंपरेला फाटा देत अमावस्येला कांद्याचे लिलाव होणार आहेत. (Nashik Lasalgaon APMC)

अमावस्येच्या तोंडावर लासलगांव बाजार समितीचा दुसरा ऐतिहासिक निर्णय, 75 वर्षांची परंपरा बंद होणार
लासलगाव बाजार समिती

नाशिक: आशिया खंडातील कांद्याची प्रसिद्ध बाजारपेठ लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. लासलगांव बाजारसमितीनं 75 वर्षाच्या इतिहासात एका नियमात प्रथमच बदल केला आहे. लासलगांवात अमावस्येच्या दिवशीही आता कांद्याचे लिलाव सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत टीव्ही 9 मराठीनंही बातमीच्या माध्यमातून आवाज उठवला होता. लासलगाव बाजार समितीमध्ये 4 जूनपासून महिलांना लिलावात होण्यास परावानगी देण्यात आली होती. अमावस्येला कांदा लिलाव सुरु करणं हा बाजारसमितीनं एका आठवड्यामध्ये घेतलेला दुसरा प्रागतिक निर्णय म्हणावा लागेल. (Nashik Lasalgaon APMC taking decision to start onion auction on Amavasya )

75 वर्षांपासूनची परंपरा

कांदा म्हटले की चटकन तोंडात नाव लासलगावचे येते. मग ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत असो लासलगावची चर्चा होतं असते. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्यावतीने प्रत्येक राज्यांमध्ये बाजार समितीची राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आल्या. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1 एप्रिल 1947 मध्ये लासलगाव बाजार समितीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत 75 वर्षांपासून एक परंपरा अवलंबली जात होती. ती म्हणजे दर महिन्याला येणाऱ्या अमावस्याला कांदा व धान्याचे लिलाव बंद ठेवणे होय.

परंपरेला फाटा देत कांदा लिलाव सुरु होणार

अमावस्येला कांदा लिलाव बंद ही परंपरा का आणि कशासाठी अवलंबली जात होती याचं उत्तर कोणाजवळही नव्हतं. मात्र, परंपरेचे काटेकोरपणे पालन केलं जायचं. आशिया खंडात नावलौकिक मिळवलेल्या लासलगाव बाजार समितीच्या प्रशासनाकडून केले जात होते या प्रचलित परंपरेला आता फाटा देत दर अमावस्येला सकाळच्या सत्रात कांद्याचे लिलाव सुरू करण्यात आले आहे.

शनिवारी दोन सत्रात लिलाव सुरु होणार

शनिवारी एका सत्रात सुरू असलेले कांद्याचे लिलाव आता दर शनिवारी दोन्ही सत्रात सुरू करण्यात येणार आहेत. लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ही माहिती दिली.

महिलांना लिलावात सहभागाची संधी

आशियातील कांद्याची अग्रेसर बाजार समितीमध्ये कृषी साधना महिला शेतकरी संस्थेवरुन व्यापाऱ्यांनी कादा लिलालावत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. टीव्ही 9 मराठीनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर व्यापाऱ्यांनी त्यांची भूमिका बदलली आहे. अखेर विंचूर येथील कृषी साधना महिला शेतकरी संस्थेला लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलावात सहभागी होण्यासाठी व्यापाऱ्यांनी बैठकीत नाफेडच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर सहमती दर्शवली.

संबंधित बातम्या:

TV9 Marathi Impact: लासलगावात स्त्री शक्तीचा विजय, कांदा लिलावात सहभागी होण्यास व्यापाऱ्यांची सहमती

Onion Price Today: शेतकऱ्यांच्या मागणीला यश, आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजार समिती सुरु

(Nashik Lasalgaon APMC taking decision to start onion auction on Amavasya )