नाशिकमधील 1184 वाडे धोकादायक, पावसाळ्यापूर्वी वाडे रिकामे करण्याचा आदेश

पावसाळा सुरू होण्याआधी केलेल्या सर्वेक्षणात नाशिक शहरातील तब्बल 1184 वाडे धोकादायक असल्याचं धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी हे धोकादायक वाडे रिकामे करण्यासंदर्भात संबंधित लोकांना महापालिका प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली आहे.

नाशिकमधील 1184 वाडे धोकादायक, पावसाळ्यापूर्वी वाडे रिकामे करण्याचा आदेश
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 5:50 PM

नाशिक : पावसाळा सुरू होण्याआधी केलेल्या सर्वेक्षणात नाशिक शहरातील तब्बल 1184 वाडे धोकादायक असल्याचं धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी हे धोकादायक वाडे रिकामे करण्यासंदर्भात संबंधित लोकांना महापालिका प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली आहे. हे धोकादायक वाडे लवकरात लवकर रिकामे करण्यात आले नाही, तर मनपा प्रशासन स्वतः धोकादायक वाडे रिकामे करतील अशा पद्धतीची माहिती मनपा कैलास जाधव यांनी दिली आहे (List of high risk old building in Nashik by Nashik corporation before rainy season).

अनेक वर्षांपासून या धोकादायक वाड्यांचा प्रश्न प्रलंबित

खरंतर आतापर्यंत नाशिक शहरात पावसाळ्यात धोकादायक वाडे कोसळून अनेकांचे मृत्यू झाले आहेत. यात काही जण गंभीर जखमी देखील झाले आहेत. असं असताना देखील गेल्या अनेक वर्षांपासून या धोकादायक वाड्या संदर्भात अद्याप कायमचा तोडगा निघू शकलेला नाही.

धोकादायक वाड्यातील नागरिकांनी किमान पावसाळा संपेपर्यंत दुसरीकडे राहायला जाणं गरजेचं

या वर्षी देखील शहरात तब्बल 1184 वाडे धोकादायक असल्याचं निष्कर्ष मनपा कडून काढण्यात आला आहे. त्यामुळे या धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी किमान पावसाळा संपेपर्यंत तरी इथून दुसरीकडे राहायला जाणं गरजेचं आहे. मात्र, यावर कायमचा तोडगा काढण्याची देखील गरज आहे.

हेही वाचा :

डोंबिवलीत पहाटे अचानक जाग आलेल्या तरुणामुळे मोठी दुर्घटना टळली, कोसळणाऱ्या इमारतीतून 14 कुटुंबांना वाचवलं

भिवंडीतील बचाव कार्य चौथ्या दिवशी संपलं, एकूण 41 जणांचा मृत्यू, 19 जण जखमी, दोनजण अद्यापही बेपत्ताच

महाड दुर्घटनेतील बांधकाम व्यावसायिकाच्या पनवेलमधील आणखी 2 इमारती अतिधोकादायक

व्हिडीओ पाहा :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.