डोंबिवलीत पहाटे अचानक जाग आलेल्या तरुणामुळे मोठी दुर्घटना टळली, कोसळणाऱ्या इमारतीतून 14 कुटुंबांना वाचवलं

डोंबिवलीच्या कोपर गावातील मैना 'व्ही 2' ही 3 मजली इमारत कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही

डोंबिवलीत पहाटे अचानक जाग आलेल्या तरुणामुळे मोठी दुर्घटना टळली, कोसळणाऱ्या इमारतीतून 14 कुटुंबांना वाचवलं

डोंबिवली : डोंबिवलीत पहाटे तीन मजली इमारत कोसळली. मात्र, अचानक जाग (Dombivali 3 Storey Building Collapse) आलेल्या तरुणामुळे मोठी दुर्घटना टळली. या तरुणामुळे 14 कुटुंबांचे प्राण वाचले. कुणाल मोहिते असं या तरुणाचे नाव आहे. त्याच्या सर्कतेमुळे इमारत कोसळण्यापूर्वीच ती रिकामी करण्यात आली. त्यामुळे या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही (Dombivali 3 Storey Building Collapse).

डोंबिवलीच्या कोपर गावातील मैना ‘व्ही 2’ ही 3 मजली इमारत कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कुणाल मोहिते

कुणाल मोहिते

डोंबिवली पश्चिमेकडील कोपर भागातील मैना ‘व्ही 2’ इमारतीत 14 कुटूंब वास्तव्यास होते. कुणाल मोहिते पहिल्या माळ्यावर राहत होता. गुरुवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास कुणाल मोहिते हा तरुण अचानक जागा झाला. तो घरातील किचनमध्ये गेला. तिथे स्लॅबचा काही भाग कोसळला होता. कुणालने याची माहिती घरच्या लोकांना दिली कुणाल आणि त्याचे नातेवाईक इमारतीबाहेर पडले. कुणालने दुसऱ्या व्यक्तीचा मादीतने बिल्डिंगमधील सर्व लोकांना जागं केलं. सर्व चौदा कुटुंब इमारतीबाहेर पडले आणि 20 मिनिटात ही संपूर्ण इमारत कोसळली.

कुणालच्या सतर्कतेमुळे बिल्डींग मधील 14 कुटुंबांचे जीव वाचले मात्र सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिधोकादायक असताना ही इमारत महापालिकेने खाली का करून घेतली नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. दरम्यान, या इमारतीत 14 कुटुंब राहत होते या सर्वांचे प्राण वाचले असल्याची माहिती पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली

इमारत रिकामी करताच अवघ्या 20 मिनिटात रहिवाश्यांच्या डोळ्यादेखत इमारत कोसळली. सुदैवाने कोणतही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सर्व कुटुंबांच्या सामानाचे प्रचंड नुकसान झाल्याचं नागरिकांनी सांगितले.

“या धोकादायक इमारतीचा भाग कोसळला असून या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी डोंबिवली अ. केंद्राचे 1 वाहन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडील संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित असून उर्वरित इमारत तोडण्याचे काम सुरु आहे”, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Dombivali 3 Storey Building Collapse

संबंधित बातम्या :

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI