राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी मांढरे; नाशिकच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार गंगाथरन यांनी स्वीकारला

| Updated on: Mar 11, 2022 | 10:42 AM

नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून सूरज मांढरे यांनी आपल्या कामाची छाप पाडली. कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी दत्तक योजना राबवली. त्यांनी या केलेल्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः कौतुक केले. त्यांचा एकात्मिक बालविकास सेवा योजन विभागाकडून जागतिक महिला दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरवही करण्यात आला.

राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी मांढरे; नाशिकच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार गंगाथरन यांनी स्वीकारला
नाशिकमध्ये गंगाथरन यांनी सूरज मांढरे यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.
Follow us on

नाशिकः नाशिकचे (Nashik) जिल्हाधिकारी (Collector) सूरज मांढरे यांची राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी (Education Commissioner) बदली झाली आहे. आता त्यांच्या जागी शासन आदेशानुसार गंगाथरन डी. यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गंगाथरन यांनी सूरज मांढरे यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन वर्ष सेवा कालावधी पूर्ण झालेल्या अधिकार्‍यांच्या तात्काळ बदल्या करा, असे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार नऊ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात डॉ. संजय चहांदे, ए. एम. लिमये, एस. ए. तागडे, आभा शुक्ला, डॉ अमित सैनी, आर. एस. जगताप, विवेक भीमानवार, राहुल द्विवेदी आणि गंगाथरन देवराजन यांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या मुख्य दालनात मांढरे यांच्याकडून गंगाथरन यांनी पदभार स्वीकारला. यावेळी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा सूचना व तंत्रज्ञान अधिकारी राजेश साळवे, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, नितीनकुमार मुंडावरे, गणेश मिसाळ, भीमराज दराडे, वासंती माळी, नितीन गावंडे, निलेश श्रींगी, ज्योती कावरे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत पवार, राजेंद्र नजन व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोरोनाकाळात उल्लेखनीय काम

नाशिकमध्ये कोरोनाची दुसरी लाट अतिशय विनाशकारी होती. कोरोनामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली. अनेक मुले पोरकी झाली. यांना आधार देण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयाने केले. सूरज मांढरे यांच्या विशेष प्रयत्नातून त्यांनी अनाथ मुलांना अधिकाऱ्यांनी दत्तक घेण्याची अनोखी योजना राबवली. अनेक मुले जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी दत्तकही घेतले. अनाथ मुलांना आर्थिक मतदही करण्यात आली. त्यांनी या केलेल्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः कौतुक केले. त्यांचा एकात्मिक बालविकास सेवा योजन विभागाकडून जागतिक महिला दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरवही करण्यात आला.

नदी महोत्सव राबवला

नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून सूरज मांढरे यांनी तीन वर्षांत आपल्या कामाची छाप पाडली. अगदी अलीकडे त्यांनी 15 डिसेंबरपासून 21 डिसेंबरपर्यंत नदीमहोत्सव हा उपक्रम आयोजित केला होता. जिल्हाधिकारी कार्यालय, राज्य पुरातत्व विभाग आणि नाशिक इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने या आगळ्यावेगळ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिकांना गोदावरीचा इतिहास, गोदावरीच्या परिसराची माहिती, वारसा फेरी, व्याख्यानांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगण्यात आले.

इतर बातम्याः

Nashik | उद्योजकाच्या घरावर दरोडा; बाळाच्या मानेवर सुरा ठेवून 50 तोळे सोने लुटले, महिलांचे तोंड चिकटपट्टीने बंद!

नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?

नाशिककरांना दिलासा; 4 वर्षांपूर्वी केलेली अव्वाच्या सव्वा करवाढ निवडणुकीच्या तोंडावर मागे!