देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट, नाशिकमधील बहुप्रतीक्षीत बससेवेला मुहूर्त मिळाला

नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal corporation) परिवहन विभागाने येत्या 1 जुलैपासून शहरात बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या या बससेवेला यानिमित्ताने आता नवीन मुहूर्त सापडला आहे.

देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट, नाशिकमधील बहुप्रतीक्षीत बससेवेला मुहूर्त मिळाला
nashik municipal

चंदन पुजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नाशिक महापालिकेच्या बससेवेला आता एक जुलैचा नवा मुहूर्त मिळाला आहे. दरवर्षी 35 कोटी रुपयांचा तोटा असलेली ही बस सेवा सुरुवातीपासूनच वादात आहे. तरीही देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने सत्ताधारी भाजपाने बस सेवा रेटून नेण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे सुरुवातीला विरोध करणारे सर्वपक्षीय नगरसेवक आता मात्र चुप्पी साधून असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Nashik municipal bus service will start from 1 july)

महापालिकेच्या परिवहन विभागाने येत्या 1 जुलैपासून शहरात बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या या बससेवेला यानिमित्ताने आता नवीन मुहूर्त सापडला आहे. येत्या 27 तारखेपासून या बसेसची ट्रायल होणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे..

महापालिकेची बससेवा वादात का?

1) मार्च 2020 नंतर बीएस 4 या तंत्रज्ञानाचा प्रदूषणकारी बसेसवर बंदी असतानाही बससेवा नाशिककरांच्या माथी मारली जात असल्याचा आरोप होतोय ..

2) या बसेस सुरू झाल्यानंतर तब्बल 35 ते 45 कोटी रुपयांचा तोटा येणार असल्याची माहिती खुद्द पालकमंत्री भुजबळ यांनी दिली, मात्र तरीदेखील या बससेवेसाठी भाजप आग्रही आहे

3) कोरोनाची तिसरी लाट आलीच तर सेवा न देताच ठेकेदाराला मलिदा दिला जाणार हे स्पष्ट असताना मंजुरी

4) महापालिकेवर आधीच एवढा कर्जाचा डोंगर असताना आणि तुलनेत उत्पन्नाचे स्रोत कमी असताना वार्षिक 35 कोटींचा तोटा कसा परवडणार असा सवाल आहे

5) आधी या बससेवेला विरोध करणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोधाला ब्रेक लावत एक्सिलरेटरवर पाय कसा ठेवला असा सवाल आहे

दरम्यान आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिकेच्या परिवहन विभागाची बैठक बोलवून 1 जुलैचा मुहूर्त निश्चित केला आहे

आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपाने बससेवेचा प्रकल्प यशस्वीपणे चालवून दाखवण्याची तयारी सुरू केली आहे. फायदा आणि तोट्याच्या पलिकडे जाऊन नागरिकांच्या सोयीचा विचार करून या बस सेवेकडे बघावं असं महापौर सतीश कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही शहराच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक अत्यंत महत्वाची असल्याचं या बस सेवेचा समर्थन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. हे जरी खरं असलं, तरी यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर पडणारा बोजा हा पर्यायाने नागरिकांवरच पडणार असल्याने याचादेखील विचार होण्याची आवश्यकता आहे. (Nashik municipal bus service will start from 1 july)

संबंधित बातम्या : 

नाशिककरांना दिलासा, म्युकरमायकोसिसचा उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे मोफत होणार, 8 रुग्णालयांची निवड

नाशिकमधील 1184 वाडे धोकादायक, पावसाळ्यापूर्वी वाडे रिकामे करण्याचा आदेश

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI